शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
2
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
3
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
4
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 
5
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
6
विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  
7
खासदारकी तर गेली, आता निदान आमदारकीची इच्छा तरी पूर्ण करा; विधानसभेसाठी पराभूत खासदारांची भाऊगर्दी 
8
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम ठेवणारे न्या. संजीव खन्ना होणार सरन्यायाधीश; ५१वे सरन्यायाधीश म्हणून ६ महिने राहणार पदाव
9
मुलासमोर लैंगिक संबंध, नग्न होणे लैंगिक छळच; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा - केरळ हायकोर्ट
10
१३ काेटी लाेक अत्यंत गरीब; १८१ रुपयांपेक्षाही कमी रोजची कमाई, दाेन वर्षांत गरिबीत घट
11
रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 
12
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो तोंडघशी; ठोस पुरावे नव्हते
13
देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 
14
न्या. संजीव खन्ना नवे सरन्यायाधीश! सरन्यायाधीश चंद्रचूड यांची शिफारस, ११ रोजी शपशविधी
15
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
16
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
17
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
18
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
19
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल

धान्य वाटले नाही, लाभार्थ्यांची झोळी रिकामी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 5:58 PM

Yavatmal : ७० परवानाधारकांना नोटीस आता लक्ष जिल्हा पुरवठा विभागाच्या कारवाईकडे

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार अंत्योदय आणि प्राधान्यक्रम गटातील लाभार्थ्यांना दरमहा १०० टक्के धान्याचे वितरण करण्याचे शासनाचे सक्त निर्देश आहे. परंतु, काही परवानाधारकांकडून याची अंमलबजावणी केली जात नाही. राळेगाव तालुक्यातील अशा ७० परवानाधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहे. यावर जिल्हा पुरवठा विभागाकडून काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना मार्च महिन्यात विहित मुदतीच्या आत अन्नधान्य प्राप्त झाले. परंतु, काही परवानाधारकांनी या महिन्यात शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित केले नाही. त्यामुळे पात्र लाभार्थी त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहिले. धान्य मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची झोळी रिकामी राहिली. तालुक्यातील क्षेत्रीय अधिकारी यासंदर्भात रेशन दुकानदारांशी वारंवार संपर्क करतात, त्यांना रेशन दुकानदार दाद देत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्र अनुसूचित वस्तू आदेश (वितरणाचे विनियमन) १९७५ अंतर्गत मंजूर केलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याने आपल्याकडील रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करून परवान्याची संपूर्ण अनामत रक्कम सरकार जमा का करण्यात येऊ नये याबाबत लेखी स्पष्टीकरण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तालुक्यातील ७० कंट्रोल दुकानदारांना नोटीसद्वारे मागितले होते.

१५ मे रोजी तालुक्यातील ७० स्वस्त धान्य दुकानदारांनी हजर राहून आपले म्हणणे सादर केलेले आहे. आता पुरवठा विभागाच्या पुढील कारवाईकडे कंट्रोल दुकानदार व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. धान्य वितरणात सातत्य राहावे यासाठी संबंधित परवानाधारकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. रेशन दुकानापर्यंत कार्डधारकांसाठी धान्य पोहोचल्यानंतरही वाटप का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रेशन दुकानदारांविरुद्ध कार्डधारकांच्या तक्रारी■ राळेगाव तालुक्यात ११४ कंट्रोल दुकाने आहेत. त्यापैकी अनेक कंट्रोल दुकानदारांविरोधात गैरकारभाराच्या वेळोवेळी गंभीर तक्रारी राहिल्या आहे. पण कधी कडक कारवाई झाली नाही. यावेळी मात्र पुरवठा विभागाने कारवाईसाठी गंभीरतेने पावले उचलल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळgovernment schemeसरकारी योजना