लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव/कळंब : विविध मागण्यांना घेऊन कळंब आणि राळेगाव नगरपंचायतच्या कर्मचाºयांनी बुधवारपासून आंदोलन सुरू केले आहे.नगरपंचायतमध्ये कार्यरत सर्व कर्मचाºयांचे सरसकट समायोजन करावे, आहे त्याच पदावर समायोजन करण्यात यावे, यासाठी त्यांची शैक्षणिक पात्रता नियुक्तीवेळी निश्चित करण्यात आली तिच ग्राह्य धरावी, नगरपंचायत कर्मचाºयांच्या आज रोजी अस्तित्वात असलेल्या पदानुसार आकृतीबंधात सुधारणा करावी, नियुक्तीपासूनची संपूर्ण सेवा त्यांच्या सेवानिवृत्ती लाभासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरावी, नगरपंचायत स्थापनेपासून पूर्ण प्रभावाने कर्मचाºयांचे समायोजन करून सुधारित वेतनानुसार होणारी थकीत रक्कम त्वरित द्यावी, नगरपंचायत स्थापनेच्या उद्घोषणेनंतर नियुक्ती देण्यात आलेल्या कर्मचाºयांच्या सेवेला तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने त्यांचेही समायोजन करावे आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.कळंब येथे नगरपंचायत कार्यालयासमोर संघटनेचे अध्यक्ष दत्ता केवटे, जयदेव केवटे आणि बबन धोबे उपोषणास बसले आहे. लेखणीबंद आंदोलनात शागिर मेहबुब शेख, गफुर इस्माईल शेख, पुनेश्वर चांदवे, अविन वेलके, प्राण रोहणे, खुशाल ठाकरे, जोत्स्रा ठाकरे, पुष्पा नेहारे, आदित्य कळमकर, सुरेश मडावी, सुनील डखरे, अमोल चतुरपाळे, सुभाष गेडाम, प्रदीप ढोरे, सुरेश टेकाम, सुनील चांदवे, किशोर महाजन, अमित मोहनापूरे आदी सहभागी झाले आहेत.राळेगाव येथे उपोषणात संघटनेचे अध्यक्ष शैलेश काळे, उपाध्यक्ष जीवन जळीतकर आदी सहभागी झाले आहेत.
राळेगाव, कळंब नगरपंचायत कर्मचाºयांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 2:14 AM
विविध मागण्यांना घेऊन कळंब आणि राळेगाव नगरपंचायतच्या कर्मचाºयांनी बुधवारपासून आंदोलन सुरू केले आहे.
ठळक मुद्देनगरपंचायतमध्ये कार्यरत सर्व कर्मचाºयांचे सरसकट समायोजन करावे,