शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

ना उम्र की सीमा हो... वय झाल्यावरही सिद्ध केली गुणवत्ता!

By अविनाश साबापुरे | Updated: May 7, 2024 17:52 IST

जिल्ह्यात ११ हजार प्रौढ झाले साक्षर : नव भारत साक्षरता परीक्षेचा निकाल जाहीर

यवतमाळ : चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी कोणताही शुभमुहूर्त पाहायचा नसतो. शिकण्यासाठी तर नाहीच नाही. हीच बाब ओळखून जिल्ह्यातील प्रौढ निरक्षरांनी यंदा आयुष्यात पहिल्यांदा शिक्षणाचे धडे गिरविले. त्यांची परीक्षा होऊन सोमवारी निकालही आला. अन् आश्चर्य ! १२ हजार ४५२ निरक्षरांपैकी तब्बल ११ हजार २७१ निरक्षर यात उत्तीर्ण झाले. अर्धे वय उलटून गेले, हातांना थरथरी, अनेकांची दृष्टीही अधू झालेली, पण अशाही आव्हानांना सामोरे जात या प्रौढांनी गुणवत्ता सिद्ध करून जिल्ह्याची मान उंचावली आहे.

१५ वर्षे आणि त्यापुढील प्रौढांसाठी यावर्षी जिल्ह्यात नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात आला. सुरुवातीला अनेक अडथळे आले, तरी नंतर मात्र या मोहिमेने चांगलाच वेग घेतला. शिक्षण विभाग आणि शिक्षकांची मेहनत फळाला आली. त्यातून तब्बल १२ हजार ४५२ प्रौढ निरक्षरांना साक्षरतेचे धडे देऊन १७ मार्च रोजी त्यांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत १५० पैकी ४९.५ गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक होते. राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे सोमवारी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात जिल्ह्यातील प्रौढांनी उत्तम कामगिरी करीत यश मिळविले आहे. विशेष म्हणजे, या परीक्षेत कुणालाही अनुत्तीर्णचा शेरा दिला गेलेला नाही, तर ४९.५ गुण न घेऊ शकलेल्या प्रौढांना ‘सुधारणा आवश्यक’, असा शेरा देऊन त्यांची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. आता १२ हजारांपेक्षा अधिक प्रौढांनी पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान व अन्य व्यावहारिक कौशल्यात यश मिळविले असून, त्यांना साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका मिळणार आहे, तसेच त्यांना मुक्त विद्यालय मंडळातर्फे पाचवी, आठवी अशा शालेय परीक्षांना बसता येणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील प्रौढांची कामगिरीपरीक्षार्थी : १२,४५२उत्तीर्ण : ११,२७१सुधारणा आवश्यक : ११८१ 

उत्तीर्ण / सुधारणा आवश्यकपुरुष : ३५९३ / २९४महिला : ७६७८ / ८८७एकूण : उत्तीर्ण : ११,२७१ / ११८१ 

वयोगटानुसार उत्तीर्ण परीक्षार्थी१५ ते ३५ वर्षे : ११९४३६ ते ६५ वर्षे : ६२५१६६ वर्षांपुढील : ३८२६ 

प्रवर्गनिहाय उत्तीर्ण प्रौढएससी : १२२१एसटी : ३५३१ओबीसी : ५४५७अल्पसंख्यक : २९७जनरल : ७६५

 

नव भारत साक्षरता कार्यक्रमात झालेल्या परीक्षेत आपल्या जिल्ह्यातील ११ हजारांपेक्षा अधिक प्रौढ उत्तीर्ण झालेत, तर पुढच्या वर्षीसाठी आपले शिक्षक, स्वयंसेवक अधिक मेहनत घेतील. जोमात काम करतील आणि याहीपेक्षा अधिक प्रौढांना साक्षर करतील.- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी (योजना), यवतमाळ

राज्याच्या निकालात जिल्हा कितवा?जिल्हा : उत्तीर्ण प्रौढजळगाव ३६८४२नाशिक २४९८२गडचिरोली २४६४४चंद्रपूर २४१८२अमरावती २३६३८नांदेड १८१७६अकोला १८०८०सोलापूर १७४३२नंदूरबार १५८०५परभणी १४६५६छत्रपती संभाजीनगर १४६००ठाणे १३०७७रत्नागिरी १२७९१पालघर १२६२४बीड ११९६६मुंबई ११८८०यवतमाळ ११२७१जानला ११११०बुलडाणा : १०४४७धुळे १०१७६पुणे ९०४२वाशिम ८९७४हिंगोली ८७५८अहमदनगर ८४०१गोंदिया ८३७६भंडारा ८२२२सांगली ७४२७रायगड ६९९४नागपूर ६७६२धाराशिव ३९११सातारा ३८५७लातूर ३०२९कोल्हापूर २२८५वर्धा १२६४सिंधुदुर्ग २२५

टॅग्स :Educationशिक्षणYavatmalयवतमाळStudentविद्यार्थी