दिग्रस : येथील विद्यानिकेतन शाळेत शहीद दिन पार पडला.
विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य असे अनेक अधिकार प्राप्त झाल्याने भारतीय नागरिकांना स्वतःचा विकास स्वतंत्रपणे साधण्याची मुभा मिळाली. याचे सर्व श्रेय भारतीय क्रांतिकारकांना जाते. त्यांचे कार्य देश स्वातंत्र्याच्या लढ्यात सूर्यासम आहे, असे मत यावेळी शाळेचे अध्यक्ष डॉ. संजय बंग यांनी व्यक्त केले.
प्रथम भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. नंतर मुख्याध्यापक निवृत्ती ढोडरे यांनी प्रास्ताविकातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांचे कार्य किती मोलाचे व निर्णायक होते, हे पटवून दिले. चंद्रकांत पोरे, युवराज मोहकर, मंगल जाधव, विकास कोठरवार यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. नितीन राऊत, विलास राऊत, मनोज चावरे, कृष्णकुमार शर्मा, अमित वानखडे, पंकज लाचुरे, श्रीनिवास देशपांडे, गणेश अंडूले, रिता गंथडे, पूनम धनुका आदींनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. संचालन हेमंत डुबे यांनी केले.