याप्रसंगी आमदार नामदेव ससाणे यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता डॉ. बाबासाहेबांनी केलेली क्रांती ही जगातील एकमेव घटना असल्याचे मत अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. रक्ताचा एकही थेंब न सांडता सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रासह शोषितांच्या उत्थानासाठी केलेली क्रांती ही जगातील एकमेव घटना असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती प्रज्ञानंद खडसे, ठाणेदार संजय चौबे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष प्रतिभा खडसे, माजी आमदार विजय खडसे, डॉ. डी. के. मुनेश्वर, डॉ. श्रीकांत खंदारे, लखन गीलोट, रवी वाघमारे, डॉ. धनराज तायडे, अशोक गांजेगावकर, दत्ता काळे, महेश काळेश्वरकर आदी उपस्थित होते.
सुरुवातीला सभापती प्रज्ञानंद खडसे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. नंतर सामूहिक त्रिशरणसह पंचशील प्रदान करण्यात आले. यावेळी खडसे यांनी, डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. ठाणेदार संजय चौबे यांनी विहारांमध्ये अभ्यासिकेच्या माध्यमातून १४ तास अभ्यास करण्याचा उपक्रम खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. संचालन प्रा. गजानन दामोदर, तर आभार विहार समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी सचिव भीमराव सोनुले, राहुल काळबांडे, उत्तमराव शिंगणकर, संतोष निथळे, विरेंद्र खंदारे, सारनाथ रोकडे, साहेबराव कांबळे, सुभाष वाठोरे व विहार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.