शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

जिल्ह्याची भूजल पातळी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:11 PM

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मान्सूनपूर्व भूजल पाहणी अहवालात जिल्ह्याची भूजल पातळी -२.२१ मिटरने घसरल्याची गंभीर माहिती पुढे आली. दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देउणे दोन मीटरची घट : धोक्याची घंटा, मोर्चे रोखण्यासाठी लावले फलक

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या मान्सूनपूर्व भूजल पाहणी अहवालात जिल्ह्याची भूजल पातळी -२.२१ मिटरने घसरल्याची गंभीर माहिती पुढे आली. दशकातील ही सर्वात मोठी घट असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले.जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ९११ मिलीमीटर आहे. गतवर्षी ५६२.९३ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ६१ टक्के आहे. अपुऱ्या पावसाने भूजलाची पातळी कमालीची घसरली. मार्चमध्ये भूजल पातळी -१ मिटर होती. आता भूजल सर्वेक्षण विभागाने मान्सूनपूर्व पातळी जाहीर केली. त्यात १६ तालुक्यांतील १८१ निरीक्षण विहिरी आणि ६४ पाणलोट क्षेत्रात भूजल पातळीत मोठी घट दिसून आली. यापूर्वी २००९ मध्ये ४७४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यावेळी भूजल पातळी - २ अंशावर पोहोचली होती. २०१८ मध्ये भूजल पातळी -२.२१ ने खाली गेली आहे. यामुळे जिल्ह्यातील पाण्याची स्थिती अधिकच स्फोटक बनली आहे.धरणाचा ‘कॅचमेंट एरिया’ वगळता जिल्ह्यातील दोन हजार १३६ गावांची भूजल पातळी सरासरी -२.२१ मिटरने खाली गेली आहे. याचा फटका सर्व तालुक्यांना बसला आहे. जिल्ह्याकरिता ही धोक्याची घंटा आहे.निळोणा, चापडोहचा जलसाठा संपलानिळोणा आणि चापडोह हे प्रकल्प गतवर्षी भरले नाही. यामुळे वेळेपूर्वीच जलप्रकल्पातील जलसाठा संपला. यानंतर या प्रकल्पामधील मृत साठा वापरण्यात आला. आता तोही संपला आहे. प्रारंभी चापडोह प्रकल्पातील जलसाठा संपला आणि शनिवारी निळोणा जलाशयातील साठा संपला. तसे फलकच जीवन प्राधिकरणाने आपल्या कार्यालयाबाहेर लावले आहे.अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील २५ लघु प्रकल्पांतील पाणी आटले. सध्या मोठ्या जलाशयात सरासरी ९.६० टक्के पाणी शिल्लक आहे. यामध्ये पूस प्रकल्पात १२.१२ टक्के, अरूणावती ४.९० टक्के, बेंबळा ११.४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी १५.८५ टक्के, तर लघु प्रकल्पांत ११.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ६२ लघु प्रकल्पांपैकी दुरूग, उमर्डा, दत्तापूर, सिंगनडोह, अर्जुना, एकलारा, वारणा, राजूर, कुंभारकिन्ही, हातोला, लोहतवाडी, नेर, दुधाना, झटाळा, अंतरगाव, म्हैसदोडका, बोरडा, निंगनूर, अंबोना, सेनद, दराटी, मुडाणा, तरोडा, पोफाळी आदी २५ प्रकल्प कोरडे पडले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई