खर्च महाबीज उचलणार : पाच हजार क्विंटल पुरवठा, ५० ते १५० शेतकरी गटरूपेश उत्तरवार यवतमाळभुईमुगाचे बियाणे सर्वाधिक महागडे आहे. यामुळे भुईमूग पेरणीचे क्षेत्र घटले. त्यात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांनी बियाण्याची निर्मिती करावी म्हणून महाबिज कंपनी पुढे आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदानावर बियाणे मिळणार आहे. याकरिता पाच हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा महाबिजने राज्याकडे वळता केला आहे. भुईमूग बियाण्याचे सरासरी १० ते १२ हजार रूपये क्विंटल असे दर आहेत. यामुळे २० किलोची बॅग २२०० ते २४०० रूपयांना शेतकऱ्यांना खरेदी करावी लागत आहे. एका एकराला साधारणत: ५० किलो बियाणे लागते. यामुळे शेतकरी ओलिताची व्यवस्था असणाऱ्या ठिकाणीच लागवड करतो. त्याकरिता प्रथमत: आर्थिक तरतुदीचा विचार करतो. या स्थितीत महाबिज कंपनी पुढे आली आहे. शेतकऱ्यांनी बियाण्याची निर्मिती करावी आणि इतर शेतकऱ्यांना पुढल्या वर्षी बियाणे द्यावे म्हणून ६० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध केले आहे. याकरिता काही अटी आहे. एका गावामध्ये किमान ५० ते १५० शेतकऱ्यांनी या बियाण्याची लागवड करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी असे शेतकरी एकत्र येतील, अशांना हे बियाणे दिले जाणार आहे.एका शेतकऱ्याला किमान दोन बॅग बियाणे मिळणार आहे. ९६० रूपयांत एक बॅग याप्रमाणे १९०० रूपयांत दोन बॅग शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्याचे परमीट तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत सर्वच शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. पाच हजार क्विंटल बियाणे राज्याकडे वळते करण्यात आले आहे. अनुदानावर बियाणे मिळत असल्याने भुईमुगाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.
६० टक्के अनुदानावर मिळणार भुईमूग बियाणे
By admin | Published: February 03, 2017 2:14 AM