सुदाम दारव्हणकरआॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतीत काही पिकले नाही, पºहाटीचे बोंडही पाण्याने सडले आणि लोकांचे देणे-घेणे कसे करावे, या विवंचनेत असणाºया दोन शेतकºयांनी सामूहिक विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पांढरकवडा तालुक्यातील वाठोडा येथे घडली. विशेष म्हणजे हे दोनही शेतकरी नात्याने एकमेकांचे व्याही आहेत. या घटनेने लक्ष्मीपूजनाला गावात कुणाच्याही घरी चूल पेटली नाही की दिवाळी सणही साजरा केला नाही.वासुदेव विठोबा रोंगे (६७) आणि वासुदेव कृष्णराव राऊत (६५) दोघेही रा.वाठोडा (ता.पांढरकवडा) अशी मृत शेतकºयांची नावे आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुरुवारी हे दोघेही राऊत यांच्या घरी बसले होते. शेतीवर चर्चा सुरू होती. शेतीने कसा दगा दिला, असे म्हणत या दोघांनीही अचानक एकत्र विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच दोघांनाही करंजीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र राऊत यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर रोंगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. परंतु काही वेळात रोंगे यांचाही मृत्यू झाला. दिवाळीच्या दिवशी
ऐन दिवाळीत दोन शेतकºयांची सामुहिक आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 2:05 PM
शेतीत काही पिकले नाही, पºहाटीचे बोंडही पाण्याने सडले आणि लोकांचे देणे-घेणे कसे करावे, या विवंचनेत असणाºया दोन शेतकºयांनी सामूहिक विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पांढरकवडा तालुक्यातील वाठोडा येथे घडली.
ठळक मुद्देदोघेही एकमेकांचे व्याहीलक्ष्मीपूजनाला गावात चूल पेटली नाही