शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

जिल्ह्यातून बढती, संधी कुणाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 11:53 PM

गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता १० आॅक्टोबर हा घटस्थापनेचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. या विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते व कुणाची वर्णी लागू शकते, याचे अंदाज राजकीय गोटात बांधले जात आहे.

ठळक मुद्देमंत्रिमंडळ विस्तार : आता १० आॅक्टोबरचा मुहूर्त, सर्वांचाच दावा आणि फिल्डींग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता १० आॅक्टोबर हा घटस्थापनेचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. या विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते व कुणाची वर्णी लागू शकते, याचे अंदाज राजकीय गोटात बांधले जात आहे. त्यासाठी प्रत्येकाच्या ‘प्लस-मायनस’च्या चर्चाही ऐकायला मिळत आहे.आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराचे अधिवेशनाच्या आधी व अधिवेशनाच्या नंतर असे कित्येक मुहूर्त टळले आहे. आता पुन्हा घटस्थापनेचे औचित्य साधून १० आॅक्टोबरचा मुहुर्त निश्चित करण्यात आला आहे. मंत्रिपदाच्या स्पर्धेतील इच्छुकांना व ज्यांनी सरकारचा कारभार अगदी जवळून पाहिला अशा राजकीय अभ्यासूंना तर आता विस्ताराच्या कोणत्याच मुहूर्तावर विश्वास राहिलेला नाही. परंतु तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुका व राज्य सरकारला उरलेले अवघे एक वर्ष बघता हा मुहूर्त आता अखेरचा असल्याने त्यावर विश्वास ठेवला जात आहे. अखेरची संधी म्हणून इच्छुकांनी पुन्हा एकदा जोरदार फिल्डींग लावली आहे.जिल्ह्यात भाजपाकडून मदन येरावार तर शिवसेनेकडून संजय राठोड राज्यमंत्री आहेत. त्या दोघांनाही बढती मिळण्याची अपेक्षा आहे. आशावादी असलेल्या या दोघांनीही कॅबिनेटसाठी आपल्या गॉडफादरकडे मोर्चेबांधणी चालविल्याची माहिती आहे. भाजपाला कॅबिनेट मिळाल्यास जिल्ह्यात त्यांचे वर्चस्व वाढणार व सेनेला मिळाल्यास त्यांचे वर्चस्व वाढणार हे राजकीय गणित आहे. नेमके हेच गणित दोन्ही पक्षाकडून श्रेष्ठींकडे मांडले जात आहे. राठोडांचे ‘मातोश्री’वर जेवढे वजन आहे तेवढेच किंवा त्या पेक्षा अधिक जिव्हाळा ‘वर्षा’वर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सेनेकडून कॅबिनेटच्या यादीत नाव आल्यास ‘वर्षा’वरूनही ते आणखी उचलून धरले जाण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांमध्ये सेनेला रोखण्यासाठी भाजपाला कॅबिनेट मंत्रिपद कसे उपयोगी पडू शकते हे श्रेष्ठींना पटवून देण्याचा प्रयत्न येथील भाजपा पदाधिकाऱ्यांकडून केला जातो आहे.दोन्ही मंत्र्यांच्या बढतीसोबतच जिल्ह्यातून आणखी कुणाला विस्तारात संधी मिळते का याकडेही नजरा लागल्या आहेत. त्यात नवनियुक्त विधान परिषद सदस्य अ‍ॅड. नीलय नाईक यांचे नाव अग्रक्रमावर घेतले जाते. नाईक घराण्यातील वारसदाराला मंत्रिपद देऊन त्याचे भाजपासाठी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मार्केटिंग करून घेण्याचा मनसुबा असल्याचे सांगितले जाते. त्यांना कृषी, जलसंधारण या सारख्या खात्यांचे राज्यमंत्री पद दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आदिवासी समाजाचा विचार झाल्यास विदर्भातून राळेगावचे भाजपा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना संधी दिली जाऊ शकते. उच्चशिक्षित, नम्र व सोबर चेहरा म्हणून त्यांचा विचार केला जाऊ शकतो. त्यासाठी विदर्भातील आदिवासी समाजाच्या राज्यमंत्र्याला डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र एका जिल्ह्यातून किती जणांना संधी हा विषयही तेवढाच महत्वाचा आहे. अन्य आमदारही आपल्याला संधी दिली जाऊ शकते असा दावा करीत आपले गणित कार्यकर्त्यांपुढे मांडताना दिसत आहेत. मात्र त्यांचे भाग्य फळफळते की नाही, हे प्रत्यक्ष विस्ताराच्या दिवशीच स्पष्ट होईल.शेजारच्या आमदाराला कॅबिनेटची शक्यताइकडे यवतमाळच्या शेजारील चांदूररेल्वे-धामणगावात अरुण अडसड यांची विधान परिषदेवर वर्णी लागली. त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले जाणार असल्याचे सांगितले जाते. फुंडकरांच्या कृषिमंत्री पदाची चर्चा असलीतरी निवडणुकीचे वर्ष असल्याने बदनामीच्या भीतीने हे पद विदर्भात न ठेवता पश्चिम महाराष्ट्रात दिले जावे, असा भाजपातील सूर आहे. तसे झाल्यास अडसड यांना महसूल सारखे वजनदार खाते देऊन त्यांची दमदार एन्ट्री केली जाऊ शकते. त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये विदर्भात पक्षासाठी करून घेतला जाऊ शकतो.

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावारSanjay Rathodसंजय राठोड