लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दारव्हा मार्गे यवतमाळात दाखल झाली. सायंकाळी या यात्रेला संबोधित करताना जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, यवतमाळची गुन्हेगारी आणि त्याला सत्ताधारी भाजपकडून मिळणारे पाठबळ हेच विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या निशाण्यावर असल्याचे निदर्शनास आले.यवतमाळात दाखल झालेल्या शिवस्वराज्य यात्रेचा मुक्काम बायपासवरील एका लॉनमध्ये आहे. याच ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, वक्ते अमोल मिटकरी यांनी यात्रेला संबोधित केले. या चारही नेत्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक विषयांनाच हात घातला. त्यातही यवतमाळची वाढती गुन्हेगारी हा विषय अग्रक्रमावर होता. यापूर्वी विधीमंडळात यवतमाळची गुन्हेगारी व त्याला मिळणारा सत्ताधाऱ्यांचा राजकीय ‘बुस्ट’ चांगलाच गाजला होता. तोच धागा पकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यवतमाळातील गुन्हेगारीची पोलखोल केली. यवतमाळचा उल्लेख त्यांनी राज्यातील दुसरी क्राईम कॅपिटल अशा शब्दात केला. यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडून गुन्हेगारांना उघडपणे मिळणारे पाठबळ हे कारणीभूत असल्याचे सांगितले. एकूणच भाजपचे मंत्री, स्वत: भाजप पक्ष राष्ट्रवादीच्या निशाण्यावर असल्याचे चित्र होते. त्या तुलनेत शिवसेनेला तेवढे टार्गेट केले गेले नसल्याचे दिसून आले.यवतमाळातील शेतकऱ्यांची स्थिती, कापूस उत्पादक जिल्हा असूनही बंद पडलेले प्रक्रिया उद्योग, केवळ नावालाच असलेल्या एमआयडीसी, तेथील उद्योगांची प्रतीक्षा, त्यामुळे निर्माण झालेली प्रचंड बेरोजगारी, संपूर्ण कर्जमाफीची केवळ आश्वासने, यवतमाळ शहरातील रस्त्यांची दोन-तीन मंत्री असूनही झालेली खस्ता हालत, पाच वर्षात काहीच न वाढलेले सिंचनाचे क्षेत्र, त्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्यांचे सुरू असलेले सत्र अशा विविध मुद्यांवर या नेत्यांनी सत्ताधाºयांवर जोरदार टीका केली. ही शिवस्वराज्य यात्रा बुधवारी आर्णी मार्गे पुसदकडे प्रस्थान करणार आहे. या यात्रेत माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी मंत्री सुभाष ठाकरे, अनिल देशमुख, माजी आमदार संदीप बाजोरिया, आमदार प्रकाश गजभिये, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, हरीश कुडे, नानाभाऊ गाडबैले, अॅड. क्रांती राऊत, आशिष मानकर, निमीष मानकर, तारीक लोखंडवाला, राजेंद्र पाटील, पांडुरंग खांदवे आदी उपस्थित होते.यवतमाळकरांनो, सांगा बेंबळाचे पाणी मिळाले काय?राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यवतमाळातील उखडलेले रस्ते, अमृत योजना, नाट्यगृह, बेंबळा प्रकल्पावरून शहरासाठी आणले जाणारे पाणी, कापूस प्रक्रिया उद्योग, टेक्सटाईल झोन अशा विविध समस्यांना आपल्या भाषणातून हात घातला. बेंबळाचे पाणी यवतमाळला १० मे २०१८ येणार होते, मग ते आले का असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. युती सरकारकडून जनतेला केवळ आश्वासने दिली जात आहे. प्रत्यक्षात त्याची पूर्तता होताना कुठेच दिसत नाही. सरकारने विकासाची कामे केली असती तर ती जनतेला जागोजागी बघता आली असती. जिल्ह्यात भाजपचे मंत्री, पाच आमदार असताना कुणालाच यवतमाळच्या वैभवात भर घालणारे नाट्यगृह पूर्ण करता आले नाही. गेल्या पाच वर्षात या मंत्री-आमदारांनी जिल्ह्याचा नेमका कोणता विकास केला हे आधी सांगावे, असे आव्हान डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.
पालकमंत्री, भाजप निशाण्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 10:13 PM
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी दारव्हा मार्गे यवतमाळात दाखल झाली. सायंकाळी या यात्रेला संबोधित करताना जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, यवतमाळची गुन्हेगारी आणि त्याला सत्ताधारी भाजपकडून मिळणारे पाठबळ हेच विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या निशाण्यावर असल्याचे निदर्शनास आले.
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा यवतमाळात मुक्काम