लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात टेक्सटाईल या विषयावर झेक रिपब्लिक स्थित टेक्निकल युनिव्हर्सिटी आॅफ लिब्रेकच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन झाले.या युनिव्हर्सिटीचे डॉ.विजय बाहेती हे प्रमुख मार्गदर्शक होते. त्यांनी ‘अॅडव्हांस टेक्सटाईल मटेरियल फ्रॉम वेस्ट फायबर’ या विषयावर मार्गदर्शन केले. जागतिक स्तरावर झालेले संशोधन, औद्योगिक व आर्थिक घडामोडींवर त्यांनी माहिती दिली. यावेळी डॉ.विजय बाहेती यांनी टेक्निकल युनिव्हर्सिटी लिब्रेक व जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात समन्वय करार करण्यासंबंधी उत्सुकता दर्शविली. या करारामुळे येत्या काळात दोन्ही संस्थेतील विद्यार्थी व शिक्षकांना शैक्षणिकदृष्ट्या लाभ होवू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. या अनुषंगाने रिसर्च इंटरशीप कार्यक्रमांतर्गत जेडीआयईटीचे विद्यार्थी व शिक्षकांना टेक्निकल युनिव्हर्सिटी आॅफ लिब्रेक झेक रिपब्लिक येथे तीन ते चार महिने संशोधासंबंधी काम करण्याची संधी मिळवत तेथील सुविधांचा उपयोग करता येणार आहे. संचालन स्वप्नजा राऊत हिने केले. या शिबिरासाठी टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, टेसा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. रामचंद्र सावंत, प्रा. सुरज पाटील, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, तसेच विनय चौरे, हर्षल सम्रीत, चेतन वारंबे, वैभव पद्मशाली, केवीन पटेल, प्रणौती म्हैसकर, अभिलाष लांजेवार, अक्षय भोयरकर, मृणाल डहाके आदींनी परिश्रम घेतले. शिबिराच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले.
‘जेडीआयईटी’त टेक्सटाईलवर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:02 PM
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात टेक्सटाईल या विषयावर झेक रिपब्लिक स्थित टेक्निकल युनिव्हर्सिटी आॅफ लिब्रेकच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन झाले.
ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात टेक्सटाईल ......