उत्तम चिंचोळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगुंज : येथील १३२ केव्ही आणि ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र रामभरोसे सुरू आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे असल्याने ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे.गुंज येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांसाठी क्वॉर्टरची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर १३२ केव्हीचे वीज उपकेंद्र मंजूर झाले. त्याच्या निर्मितीसाठी जागा अपुरी पडत असल्याने कर्मचाऱ्यांचे क्वॉर्टर पाडून नवीन उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. परिणामी कनिष्ठ अभियंता व कर्मचारी येथे किरायाच्या खोलीत राहात होते. मात्र आता कनिष्ठ अभियंता थेट यवतमाळ येथून ये-जा करतात. लाईनमन व इतर कर्मचारीही मुख्यालयी राहात नाही.वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी येथे कुणीही भेटत नाही. वरिष्ठांकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही. या केंद्रात अधिकारी, कर्मचारी राहात नसल्याने वीज चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा परिणाम ट्रान्सफार्मरवर होत आहे. एका दिवसात ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे. गुंज परिसरात गुंज, माळकिन्ही, सारकिन्ही येथील ट्रान्सफार्मर जहाले आहे. विशेष म्हणजे एकच ट्रान्सफार्मर पाचवेळा जळाले. माळकिन्ही येथील ट्रान्सफार्मर दोनदा तर पेट्रोलपंपाजवळील ट्रान्सफार्मर तीनदा जळाले. नवीन ट्रान्सफार्मर एक दिवस चालल्यानंतर लगच जळतो. यामुळे ग्राहक त्रस्त झाले. महावितरणप्रती प्रचंड असंतोष खदखदत आहे.कंपनीसोबत साटेलोटेएकाच दिवसात ट्रान्सफार्मर जळत असल्याने वीज वितरणचे ट्रान्सफार्मर दुरुस्ती करणाºया कंपनीशी साटेलोटे असल्याचा आरोप होत आहे. दुरुस्त करून आणलेले ट्रान्सफार्मर सुरू करताच दोन तासात जळाले. यामुळे ही शंका बळावली आहे. यात वीज वितरण कंपनीचेही नुकसान होत आहे. ग्राहकांना अंधारात राहावे लागत आहे. वरिष्ठांनी ट्रान्सफार्मर दुरुस्ती करणाऱ्या कंपनीवर कारवाई करून झालेला भुर्दंड त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी होत आहे. तसेच मुख्यालयी न राहणाऱ्या कनिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी आहे.
गुंजचे वीज केंद्र वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 9:50 PM
येथील १३२ केव्ही आणि ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र रामभरोसे सुरू आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे असल्याने ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे.
ठळक मुद्देवीज ग्राहक त्रस्त : एका दिवसातच जळत आहे ट्रान्सफार्मर