शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

गुरूजी, शाळा बंद...तुर्त गाव सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 5:32 PM

झेडपीचे फर्मान : यवतमाळातील ११८ ग्रामपंचायतींवर मुख्याध्यापक झाले प्रशासक

यवतमाळ : कोरोनामुळे खेड्यापाड्यातील शाळा बंदच असून गुरूजी या कंटाळवाण्या सुटीत घरगुती कामांत मश्गूल आहेत. मात्र आता शिक्षकांच्या या मोकळ्या वेळेचा उपयोग गावाच्या कारभारासाठी करून घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील ११८ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून मुख्याध्यापकांची नेमणूक करण्यात आली असून जिल्हा परिषदेने सोमवारी सायंकाळी आदेश निर्गमित केले.आॅगस्टमध्ये जिल्ह्यातील १५९ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत संपली. मात्र कोरोना संकटामुळे तेथे लगेच निवडणूक शक्य नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रशासक नेमण्यासाठी त्या-त्या पंचायत समिती स्तरावरही पुरेसा कर्मचारीवर्ग नाही. अखेर संबंधित गावातीलच जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला ग्रामपंचायतीची सूत्रे सोपविण्याचा निर्णय सीईओ डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी घेतला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या असून मुख्याध्यापकांना तत्काळ ग्रामपंचायतीची सूत्रे स्वीकारून तसा अहवाल गटविकास अधिकारी यांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या निर्णयाने शिक्षक वर्तृळात 'कही खुशी कही गम' स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अतिरिक्त जबाबदारी शिरावर लादल्याबद्दल कुठे कुरबूर व्यक्त होत आहे, तर कुठे ग्रामपंच्यायतीच्या माध्यमातून शाळेला उर्जितावस्था मिळवून देण्याची खुमखुमी व्यक्त होत आहे.मात्र या मुख्याध्यापकांना अधिनियमाला अनुसरूनच गावाचा कारभार करावा लागणार आहे. शिवाय ग्रामपंचायतींच्या कामकाजात त्यांना मताधिकार नसेल. कारभारात गैरवर्तणूक आढळल्यास प्रशासकपद रद्द होण्यासोबतच 'गुरू' म्हणून गावाने दिलेल्या इभ्रतीला धक्का पोहोचण्याचा धोका आहे.

बाॅक्सया गावांचे हेडमास्तर कारभारीपांढरकवडा तालुका :लिंगटी, तेलंग टाकळी, करणवाडी, वागदा, दहेली तांडा, बोरगाव, आकोली खु., वाठोडा.उमरखेड तालुका :बाळदी, बोथा वन, चालगणी, डोंगरगाव, खरूस बु., कोपरा खु., कुपटी, लिंबगव्हाण, सोईट घ., सुकळी न., उंचवडद.आर्णी तालुका :दाभडी, सुकळी, शिरपूर, येरमल हेटी, पहूर नस्करी, पांढुर्णा.कळंब तालुका :शरद, मेटीखेडा, शिवणी, कामठवाडा, चापर्डा, खैरी, पोटगव्हाण, प्रधानबोरी, नांझा, किन्हाळा, देवनळा, वटबोरी, कात्री, बेलोरी, कोळझरी, गणेशवाडी, रूढा, मानकापूर, माटेगाव.बाभूळगाव तालुका :यरंडगाव, खर्डा, फाळेगाव, सरूळ, महंमदपूर, नांदुरा बु., टाकळगाव, मानकापूर दे., कोटंबा, मादणी, करळगाव, गळव्हा, आलेगाव, आसेगावदेवी, दाभा, माहुली, नागरगाव, राणी अमरावती.राळेगाव तालुका :आंजी, वाढोणाबाजार, आष्टोणा, धुम्मकचा, करंजी, भांब, वेडशी, बोरी ई., खडकी, किन्ही ज., पिंपळापूर, मेगापूर, पिंप्री सा., रिधोरा, झुल्लर.दारव्हा तालुका :ब्रह्मी, वारजई, चाणी, मोझर ई., धुळापूर, शेलोडी, चिकणी, किन्ही वळगी, खेड, कु-हाड बु., कु-हाड खु., धामणगावदेव, तोरनाळा, बोथ, टाकळी बु., सायखेडा, गणेशपूर, शेंद्री बु., पाळोदी, वागद बु., ब्रह्मनाथ, डोल्हारी घना, मानकोपरा, नखेगाव, वरुड, भुलाई, खोपडी, तरोडा, बानायत, सावळा, कोलवाई.मारेगाव तालुका :आकापूर, कोलगाव, मांगरुळ, टाकरखेडा, दांडेगाव, आपटी, करणवाडी, हिवरा मजरा, टाकळी, इंदिराग्राम.

४१ गावात वेगळे प्रशासक११८ गावात मुख्याध्यापक नेमले असले, तरी जादा लोकसंख्येच्या ४१ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, शाखा अभियंता आदींच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यात तरनोळी, महागाव कसबा, बोदेगाव, वडगाव गा., बोरी खु., देउरवाडी, वडकी, दहेगाव, विडूळ, साखरा, केळझरा को., खंडाळा, परसोडा, लोणी, पळशी, केळझरा वरठी, अंतरगाव, ईचोरा, दहेली, कवठाबाजार, पिंपरी बोरी, उमरी पोड, रूंझा, पाटणबोरी, कुंभा, पहूर, सावर, नायगाव, कोंढा, वाटखेड खु., मिटणापूर, सावंगीमांग, गणोरी, गिमोणा, कोपरा जा., पाचखेड, घारफळ, परसोडी, शेळी, पार्डी नकटी, जोडमोहा या गावांचा समावेश आहे.