लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील जलप्रकल्पात निम्मेच पाणी शिल्लक आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पाची अवस्था सारखीच आहे. याचा फटका मर्यादित सिंचनाला बसला आहे. उन्हाळी पिकांची लागवड यामुळे प्रभावित झाली आहे.मोठ्या पूस प्रकल्पामध्ये ५५.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अरूणावती प्रकल्पात ३७.११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बेंबळा प्रकल्पात २९.७३ टक्के तर इसापूर धरणात ५२.५७ टक्के जलसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांची अवस्था उत्तम आहे. मात्र मध्यम आणि लघु प्रकल्पाची अवस्था बिकट आहे. अडाण प्रकल्पात ४०.४५ टक्के, नवरगाव ५१.१२ टक्के, गाकी ४८.४७ टकके, वाघाडी ५२.२१, सायखेडा ४२.७९, अधरपूस ५५.६, बोरगाव ४०.८५, निळोणा ८१.३७, चापडोह ८५.३१ तर १०७ लघु प्रकल्पामध्ये ३८ टक्के जलसाठा शिल्लक आहे.मुबलक पाणी असूनही कपात लादलीजिल्ह्यातील एकूण प्रकल्पाचा आढावा घेतला तर निळोणा आणि चापडोह या दोन्ही प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ८५ टक्के जलसाठा आहे. तरी यवतमाळकरांना पाण्यासाठी सात दिवस प्रतीक्षा करावी लागते. अनेक भागत तर वेळेवर नळ येत नाही. तर शहरातील अनेक भागात पाईपलाईन सतत फुटत राहते. मात्र यवतमाळकरांना पाणी मिळत नाही. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. यामुळे मुबलक पाणी असतानाही यवतमाळकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींची याकडे डोळेझाक सुरू आहे.
जलप्रकल्पांचा साठा निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:12 PM
यावर्षीच्या अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील जलप्रकल्पात निम्मेच पाणी शिल्लक आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पाची अवस्था सारखीच आहे. याचा फटका मर्यादित सिंचनाला बसला आहे. उन्हाळी पिकांची लागवड यामुळे प्रभावित झाली आहे.
ठळक मुद्देउन्हाळ्याचे वेध : लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पातही अपुरे पाणी