लोकमत न्यूज नेटवर्कगुंज : शासनाच्या धोरणाचा निषेध करीत महागाव तालुक्यातील गुंज येथे शेतकºयांनी सोमवारी चक्का जाम आंदोलन केले. माहूर-पुसद-महागाव या टी पॉर्इंटवर तब्बल दोन तास वाहतूक रोखून धरण्यात आली होती.महागाव तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. निसर्गाच्या अवकृपेने प्रचंड नुकसान होत आहे. त्यातच आता शासनाचे धोरणही कुचकामी ठरत आहे. कर्जमाफी जाहीर केली, परंतु शेतकºयांना पैसे मिळाले नाही. बोंडअळीने संपूर्ण कपाशी उद्ध्वस्त केली. या शेतकºयांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, कापूस व सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के भाव देण्यात यावा, कुठलेही निकष न लावता सरसकट कर्जमाफ करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, महागाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आदी मागण्यांसाठी रस्ता रोको करण्यात आला. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन महागाव दंडाधिकारी एस.बी. शेलार यांना दिले.यावेळी शेतकरी नेते नागोराव पाटील, मनीष जाधव, प्रमोद जाधव, सभापती गजानन कांबळे, दिनेश तळणकर, राम देवकते, अरुण पाटील, रामेश्वर पवार, संतोष मते, माधवराव कानडे, प्रकाश धनगर, शेमसर पठाण, गणेश तोडक, विनोद आडे, सुनील बोक्से, विश्वनाथ कलाणे, रामदास चव्हाण, उत्तमराव चिंचोळकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
गुंज येथे चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:23 PM
शासनाच्या धोरणाचा निषेध करीत महागाव तालुक्यातील गुंज येथे शेतकºयांनी सोमवारी चक्का जाम आंदोलन केले.
ठळक मुद्देशासनाचा निषेध : पुसद-माहूर मार्गावरील वाहतूक शेतकºयांनी केली ठप्प