शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

तूर खरेदी केंद्रात हमालांची हाणामारी

By admin | Published: May 04, 2017 12:14 AM

येथील शासकीय तूर खरेदी केंद्रात पोलिसांसमक्षच हमालांमध्ये हाणामारी झाली. यात चक्क शस्त्रही निघाले.

पोलिसांंसमक्ष घटना : दगडही भिरकावला यवतमाळ : येथील शासकीय तूर खरेदी केंद्रात पोलिसांसमक्षच हमालांमध्ये हाणामारी झाली. यात चक्क शस्त्रही निघाले. ही घटना बघणाऱ्या शेतकऱ्यांवर दगड भिरकावण्यात आला. काटा व चाळणी फेकण्यात आली. एवढेच नव्हे, तर पोलिसाचे दुचाकी वाहनही पाडण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली. येथील बाजार समितीत सर्वाधिक तूर विक्रीस आली. यामुळे केंद्रावर कोणताही गोंधळ उडू नये म्हणून आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी बाजार समितीच्या आवारातच पोलीस चौकी सुरू करण्यात आली. असे असतानाही बुधवारी दुपारी हमालांमध्ये अंतर्गत कारणावरून फ्री स्टाईल झाली. यात शस्त्रही निघाले. हा प्रकार पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर एका हमालाने चक्क दगड भिरकावला. तेथे तैनात पोलिसाचे वाहनही आडवे केले. ही घटना घडली त्यावेळी बाजार समितीच्या आवारात केवळ एकच पोलीस होता. त्यांनी एकदा संबंधित हमालाला हटकले. मात्र त्याला न जुमानता त्याने शेतकऱ्यांवर दगड भिरकावत काटा व चाळणी फेकून दिली. यामुळे शेतकरी संतापले होते. काही काळानंतर तेथे इतर पोलीस धडकले. त्यांनी आपल्या सहकाऱ्याला तेथून परत नेले. मात्र परिस्थतीवर नियंत्रण मिळविण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही. हमालांमधील हाणामारीत चक्क शस्त्र निघताच काही हमालांनी तिकडे धाव घेत दुसऱ्या हमालाचे प्राण वाचविले. (शहर वार्ताहर)