लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शहरातील नेताजी चौकात चारही बाजूने अतिक्रमणाचा विळखा होता. याबाबत व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात नगरपरिषदेची बाजू मान्य ठरवित शहराच्या सुशोभिकरणासाठी या चौकातील अतिक्रम काढण्यात आले. शुक्रवारी सकाळी या परिसरात बुलडोजर फिरविण्यात आला.नेर शहरातील नेताजी चौकासमोरील व मागील जागेत ग्रामपंचायतीच्या काळात दुकाने लावण्यात आली होती. ग्रामपंचायतीने अनेक वर्ष या जागेचे व्यावसायिकांकडून भाडे वसूल केले. त्यानंतर २००८ मध्ये नेर नगरपरिषद अस्तित्वात आली. प्रशासकीय अधिकारी नंदकुमार बेंडसे यांनी त्यावेळी व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर या आदेशाविरोधात व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली. ११ वर्षांपासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. या अतिक्रमणामुळे नगरपरिषदेचे अधिकृत व्यापारी संकुल झाकल्या गेले होते. नागरिकांना कसरत करून येथे ये-जा करावी लागत होती. या चौकातून चारचाकी वाहन नेताना प्रचंड सर्कस करावी लागत होती. चौकातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात नगरपरिषदेने पुन्हा नोटीस बजावल्या. न्यायालयातील याचिका खारिज झाल्याने नगरपरिषदेने अतिक्रमण काढण्यासाठी थेट बुलडोजर लावले. व्यावसायिकांनी रात्रीतूनच आपल्या दुकानातील माल हलविला. सकाळी हा संपूर्ण चौक बुलडोजरने अतिक्रमणमुक्त करण्यात आला. ही कारवाई नगरपरिषद मुख्याधिकारी नीलेश जाधव, अभियंता रवी कलोसे, ठाणेदार अनिल किनगे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
पालिकेचा नेर शहरातील अतिक्रमणावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:26 PM
शहरातील नेताजी चौकात चारही बाजूने अतिक्रमणाचा विळखा होता. याबाबत व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात नगरपरिषदेची बाजू मान्य ठरवित शहराच्या सुशोभिकरणासाठी या चौकातील अतिक्रम काढण्यात आले. शुक्रवारी सकाळी या परिसरात बुलडोजर फिरविण्यात आला.
ठळक मुद्देयाचिका खारिज : नेताजी चौक झाला मोकळा