लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. दुपारी ४ पर्यंत ही मोहीम सुरू होती. ७० ते ८० दुकानांचे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात आला.शारदा चौक ते आरटीओ कार्यालय या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत होती. अनेक दुकानदारांनी रस्त्यावर शेड काढले होते. तर काही ठिकाणी टपऱ्या लागल्या होत्या. नगरपरिषद अतिक्रमण विभाग रस्ते सुरळीत ठेवण्यासाठी ठराविक कालावधीनंतर अतिक्रमणाची मोहीम हाती घेत आहे. मंगळवारी या मोहिमेमुळे पांढरकवडा व नागपूर जाणारे दोनही रस्ते मोकळे केले. सर्वाधिक गजबज असलेल्या कळंब चौकातील अतिक्रमण जमिनदोस्त करण्यात आले. ही मोहीम मुख्याधिकारी अनिल अढागळे यांच्या निर्देशावरून अतिक्रमण पथक प्रमुख डी.एम. मेश्राम यांनी राबविली. यावेळी बांधकाम अभियंता गजानन वातीले, आरोग्य निरीक्षक राहुल पळसकर, प्रफुल्ल जनबंधू, लता गोंधळे, सुरेंद्र गोंधळे यांच्यासह पालिकेचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. अतिक्रमण मोहीम सुरू झाल्याचे लक्षात येताच अनेक दुकानदारांनी आपले रस्त्यावरचे शेड काढण्यास सुरुवात केली. काहींची शेड अतिक्रमण पथकाने उखडून काढली. या कारवाईमुळे परिसर मोकळा झाला असून वाहतूक कोंडीची तीव्रता बऱ्याचअंशी कमी झाली आहे.कळंब चौकात तणावनगरपरिषदेचे अतिक्रमण विरोधी पथक आरटीओ आॅफिसकडून कळंब चौकाकडे अतिक्रमण काढत येत असताना तेथे मोठा जमाव तयार झाला. अतिक्रमण मोहिमेला विरोध करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने कुणीही हस्तक्षेप करू शकले नाही. आरडाओरडा करण्यापलिकडे अनुचित प्रकार घडला नाही. कळंब चौकातील असलेले अतिक्रमण नगरपरिषद पथकाने काढून टाकले.
पालिकेचा अतिक्रमणावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:37 PM
नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. दुपारी ४ पर्यंत ही मोहीम सुरू होती. ७० ते ८० दुकानांचे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात आला.
ठळक मुद्देधडक मोहीम : शारदाचौक ते आरटीओ कार्यालय, कळंब चौक मार्ग मोकळा