लोंबकळणाऱ्या तारामुळे अपघातास निमंत्रण
पांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेकांच्या घरावरून तर काहींच्या अगदी घरासमोरून विद्युत तारा गेल्या आहेत. काही ठिकाणी या तारा जीर्ण झाल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच अनेक खांब जीर्ण झाले असून त्यांना टेकू देण्यात आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन या तारा महावितरणने बदलून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
निराधारांच्या समस्या सोडविण्याची मागणी
पांढरकवडा : तालुक्यातील निराधार आणि शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हे निराधार संबंधित कार्यालयात गेल्यास त्यांना धड माहितीसुद्धा दिली जात नाही. या प्रकाराकडे मात्र लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन निराधारांच्या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळीत
पांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा पुन्हा विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत असून एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हेकेखोरपणाच्या कारभाराबद्दल अनेक कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्य सेवा विस्कळीत होत असल्याची नागरिकांची ओरड आहे.