शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

अपंग दिलीपच्या दानाने वाहतो माणुसकीचा झरा

By admin | Published: April 09, 2016 2:45 AM

धनाढ्य दानकर्त्यांच्या तुलनेत श्रेष्ठ ठरावे असे त्यांचे ते दान. त्या दानाला मानवतेची, आत्मियतेची, त्या पाठीमागील भावनेची किनार.

घाटंजी : धनाढ्य दानकर्त्यांच्या तुलनेत श्रेष्ठ ठरावे असे त्यांचे ते दान. त्या दानाला मानवतेची, आत्मियतेची, त्या पाठीमागील भावनेची किनार. शारीरिकदृष्ट्या अपंग पण विचार पंगू नाहीत. त्या विचारात मानवतावादी दृष्टिकोन. शारीरिक अपंगत्वामुळे स्वत: झेलत असलेल्या अडचणींवर मात करत दुसऱ्यांना आनंद देण्याचा, त्यांचे कष्ट होईल तेवढे कमी करण्याचा त्याचा प्रयत्न. या प्रयत्नातून त्याने स्वत:ची तीनचाकी सायकल दुसऱ्या एका अपंग व्यक्तीला दान देवून त्याचे जीणे सुसह्य करण्याचा त्याचा अंतरिक हेतू. हे निश्चितच एखाद्या धनाढ्य दानशुराच्या तुलनेत जड भरणारे आहे. राजूरवाडी येथील दिलीप निखाडे हे अपंग आहेत. त्यांच्याकडे तीनचाकी सायकल आहे. घाटंजी येथील युवा संघटना अपंगांसाठी काम करते आहे, हे त्यांच्या कानी गेले. दिलीपने या युवकांची भेट घेतली. तुमच्या कार्यात माझेही योगदान असावे, असा मनोदय व्यक्त केला. त्याने जे देण्यायोग्य आहे, ते स्वत:ची तीन चाकी सायकल दान दिली. त्याच्या या दानाने युवक संघटना भारावून गेली. त्याची ही माणूसकी प्रेरणादायी ठरावी अशीच आहे. या युवक संघटनेच्या माध्यमातून दिलीपने दिलेली सायकल हिवरधरा येथील अत्यंत गरीब असलेल्या अपंग सीताराम तोडसाम यांना दान दिली. (तालुका प्रतिनिधी)