लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : डीजिटल इंडियाचे स्वप्न बघणाºया शासनाने पीक विम्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सक्ती केली. मात्र शेवटच्या दिवशी ई-महासेवा केंद्रांनी हात वर केल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकºयांना पीक विम्याचे अर्जच सबमिट करता आले नाही.जिल्ह्यातील चार लाख शेतकरी पीक विमा काढण्याच्या तयारीत होते. मात्र केंद्र आणि राज्य शासनाच्या आॅनलाईन सक्तीच्या धोरणाने हजारो शेतकºयांना विम्याचा अर्जच भरता आला नाही. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकांनी ३१ जुलैपर्यंत संगणकाची आॅनलाईन गती वाढेल, अशी हमी मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यांच्या ‘व्हिसी’च्या संभाषणाने जिल्हा प्रशासन समाधानी झाले होते. प्रत्यक्षात आॅनलाईन गती वाढलीच नाही. यामुळे शेतकºयांना पीक विम्याचा अर्जच भरता आला नाही.शेतकºयांचे वास्तव्य गावात असते. आता गावोगावी संगणक आणि इंटरनेट पोहोचले. मात्र गावात इंटरनेटची स्पिड नसल्याने अनेक शेतकºयांनी विमा काढण्यासाठी शहराकडे धाव घेतली. तथापि शहरातही स्पिड नसल्याने मोजक्याच अर्जानंतर सेतू केंद्रांनी आॅनलाईन प्रक्रिया बंद केली. त्यामुळे हजारो शेतकºयांना पीक विम्याचा अर्जच सादर करता आला नाही.प्रशासनाकडूनही निराशाचजिल्ह्यातील काही तालुक्यांत तर खुद्द कर्मचाºयांनीच सेतूला बाहेरून कुलूप लावले. सेतू केंद्र असल्याचे समजून अनेक शेतकरी परत गेले. शहरात ई-महासेवा केंद्र आणि सेतूने शेवटच्या दिवशी हात वर केले. यामुळे संतप्त व निराश शेतकºयांनी जिल्हा प्रशासन, कृषी विभागाकडे धाव घेतली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. परिणामी हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले.
ई-महासेवा केंद्राचे हात वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 11:42 PM
डीजिटल इंडियाचे स्वप्न बघणाºया शासनाने पीक विम्यासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सक्ती केली.
ठळक मुद्देपीक विमा : शेवटच्या दिवशी अर्ज अपलोडच झाले नाही