लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हर.. हर.. महादेव, बमबम भोले, असा जयघोष शुक्रवारी पहाटेपासूनच शिवालयात गुंजला. भक्तांचे जत्थे शिवालयांत दर्शनासाठी रांग लावून होते. मध्यरात्रीपर्यंत भक्तांची मांदियाळी कायम होती. निमित्त होते, महाशिवारात्रीचे.जिल्ह्यातील शुक्रवारी शिव भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यवतमाळातील केदारेश्वर, लोहारातील कमलेश्वर, निसर्गाच्या सानिध्यातील चौसाळेश्वर, पाचधारा, मनदेव, तपोनेश्वर, चंडिकेश्वर, दक्षेश्वर, दाभडीचे आेंकारेश्वर, बारलिंगेश्वर, महागाव कसबाचे महादेव मंदिर गजबजून गेले होते.शिवालयांमध्ये दिवसभर धार्मिक उत्सवांचे आयोजन केले होते. लघुरूद्र, शिवलीलामृत पारायण, अभिषेक पूजा करण्यात आली. लोहारा येथील कमलेश्वर मंदिरातत भक्तांनी दोन किलो चांदीचा मुकूट चढविला. हा मुकूट उज्जैन येथील मुकुटाप्रमाणे आहे. येथे पहाटेपासूनच भक्तांची गर्दी होती. मंदिर व्यवस्थापनाने मंडप टाकला होता. शिवालयाला फुलांनी सजविण्यात आले होते. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी उपवास साहित्याची व्यवस्था केली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पर्यावरणावर भर देणारे फलक या ठिकाणी लावण्यात आले होते.यवतमाळात बुरूड समाज संघटनेने दुपारी शिव पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. लोखंडी पुलापासून निघालेली ही पालखी विठ्ठल मंदिर, राम मंदिर, पंचवटी, महादेव मंदिर मार्गाने मार्गक्रमण करीत बुरूड समाज शिव मंदिरात समारोप झाला. या शोभायात्रेत संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव सहभागी होते.दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा, महागाव तालुक्यातील वाकोडी येथील शिवमंदिरातही भक्तांची सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती.केदारेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगस्थानिक केदारेश्वर मंदिरातही पहाटेपासून भक्तांची गर्दी होती. मंदिर व पिंड आकर्षक फुलांच्या हारांनी सजविण्यात आले होते. दर्शनासाठी येणाºया भक्तांना उपवास साहित्याचे वाटप केले. याकरिता ५० कार्यकर्त्यांचा समूह परिश्रम घेत होता. तीन क्विंटल आलूचा शिरा, सात क्विंटलचे उसळ, ११ ड्रम फराळी चिवडा, ५०० किलो फळांचे येथे वितरण करण्यात आले. शिवालय परिसरात जत्रा भरली होती. मंदिर परिसरात सुरक्षेसाठी पोलीस तैनात होते. परिसर शिवमय झालेला होता.
‘हर हर महादेव’चा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 6:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : हर.. हर.. महादेव, बमबम भोले, असा जयघोष शुक्रवारी पहाटेपासूनच शिवालयात गुंजला. भक्तांचे जत्थे शिवालयांत ...
ठळक मुद्देकेदारेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांग