यवतमाळ : ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची गरज आहे. हे काम तातडीने पूर्ण करता यावे यासाठी यवतमाळ शहरात विशेष आधार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
अनेकांनी आधार कार्ड काढून आता दहा वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. या कार्डला आता बदललेला पत्ता, नावातील बदल, जन्मतारीख किंवा बायोमेट्रिक आदीसंदर्भातील बदल अद्ययावत करण्याची गरज आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी २६ मे रोजी असे आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने तहसीलदार डाॅ. योगेश देशमुख यांनी यवतमाळ शहरात विशेष आधार शिबिर आयोजित करण्यासाठी ३० मे रोजी आदेश काढले आहेत.
त्यानुसार शहरातील एकंदर आठ ठिकाणी हे शिबिर येत्या ५ जूनपासून घेतले जाणार आहे. शिबिराच्या ठिकाणी संबंधित आधार केंद्र चालकांना आपला आधार संच घेऊन लोकांना सेवा देण्याबाबत तहसीलदारांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे शहरातील रहिवाशांना आपल्या परिसरातच आधार कार्ड अपडेट करून घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
अशी असतील आधार अपडेशन शिबिरेदिनांक : ठिकाण : आधार केंद्र चालक५ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, वडगाव : अमित जोशी५ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, लोहारा : निखिल महल्ले७ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, वाघापूर : निखिल महल्ले७ जून : जि. प. शाळा, पिंपळगाव : पवन भेंडे९ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, मोहा : पवन भेंडे९ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, भोसा : हरीओम गाडगे११ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, उमरसरा : नवाज अहमद इस्माईल खान१२ जून : नगर भवन, यवतमाळ : नवाज अहमद इस्माईल खान