लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पिंपळगाव परिसरातील बालाजी पार्क परिसरातील मुबलक पाण्याची विहीर नगरपालिकेने अधिग्रहित केली. मात्र, याच विहिरीच्या परिसरातील शेकडो घरांना पाणी मिळेनासे झाले. गेल्या महिनाभरापासून पाणी न मिळाल्याने अखेर गुरुवारी येथील महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.यवतमाळ नगरपरिषदेच्या प्रभाग ४ मध्ये मोडणाऱ्या बालाजी पार्क परिसरात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. दीडशेहून अधिक घरे असलेल्या या भागात पालिकेचा टँकर कधीही फिरकत नाही. टँकर आला तरी तो मोजक्या घरांनाच पाणी देतो, असा आरोप नागरिकांनी केला आहे. शिवाय, शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बालाजी पार्कमधीलच विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. या विहिरीत काही खासगी लोकांनी मोटरपंप बसवून पाणी ओढणे सुरू केले आहे. मात्र याच विहिरीच्या भोवती राहणाºया रहिवाशांना पाणी मिळेनासे झाले आहे. टँकरचे पाणी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागते.या अन्यायाला कंटाळून गुरुवारी येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले. बालाजी पार्कमध्ये तातडीने पाणीपुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अधिग्रहित विहीर परिसरात हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 10:35 PM
पिंपळगाव परिसरातील बालाजी पार्क परिसरातील मुबलक पाण्याची विहीर नगरपालिकेने अधिग्रहित केली. मात्र, याच विहिरीच्या परिसरातील शेकडो घरांना पाणी मिळेनासे झाले.
ठळक मुद्देबालाजी पार्क : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक