रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घातक रसायनाच्या माध्यमातून फळे पिकविली जातात. हे रसायन मानवी आरोग्यासाठी घातक आहे. रसायनाच्या वापरानंतर उरलेले अवशेष पर्यावरणालाही घातक आहे. यामुळे ते कचरागाडीत टाकता येत नाही. कचरेवाला असा कचरा स्वीकारत नाही. अशा कचऱ्यामुळे थेट व्यापाऱ्यांवर कारवाई होण्याचा धोका असतो. यामुळे काही व्यावसायिक वापरल्या गेलेल्या रसायनाचा कचरा शहराबाहेर नेऊन फेकतात. जंगलामध्ये आता या रसायनांचा खच दिसत आहे. विशेष म्हणजे, जंगलातील वन्यप्राणी आणि पक्षी यावर ताव मारतात. यामुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.संपूर्ण शहर माळरानावर वसले आहे. शहराच्या चारही दिशेने जंगलाचा मोठा भाग आहे. शहरापासून काही अंतर गेल्यानंतर घाट पहायला मिळतो. दारव्हा, अमरावती, घाटंजी, बाभूळगाव या मार्गावर वळणाचा रस्ता पहायला मिळतो. प्रत्येक वळणवाटेवर मोठी वनसंपदाही आहे. याच भूभागावर कॅरिबॅगचा मोठा कचरा जमा झाला आहे. घाटंजी आणि आर्णी मार्गावर अशा प्रकारचे कॅरीबॅगचे अच्छादन पहायला मिळते.तर दारव्हा, अमरावती आणि बाभूळगाव मार्गावर रसायनाचा कचरा अलीकडे दृष्टीस पडतो आहे. पर्यावरणासोबत वन्यजीवालाही यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. आंबे, केळी, टरबुज आणि खरबुज यासोबत द्राक्षे आणि पपई पिकविण्यासाठी रसायनाचा वापर होतो. काही व्यापारी कच्च्या स्वरूपात आणलेले फळ या रसायनामधून बुचकळून काढतात. त्या फळांना पेपरचे अच्छादन गुंडाळल्या जाते. दुसºया दिवशी ही पिकलेली फळे बाजारात येतात. याचवेळी अच्छादनाकरिता गुंडाळलेले पेपर कचरा म्हणून रसायनासोबत एका बाजूला गोळा केल्या जातात. त्याला शहराबाहेर नेऊन फेकले जाते. यासोबत सडलेली फळेही जंगलात फेकली जातात. जंगलातील प्राणी असे ढिगारे उकरून काढतात. त्यातील खाद्यपदार्थ खातात. आणि कागदाचा लगदा तिथेच पडून असतो. रसायनाचा हा कागद वन्यप्राण्यांच्या पोटात जातो. कॅरिबॅगमुळे झाडांना पाणी मिळत नाही.औषधी, इंजेक्शन, सलाईनही...औषधी, गोळ्या, इंजेक्शन, सलाईन आणि विविध वस्तू या जंगलामध्ये सिलबंद अवस्थेत फेकलेल्या आहेत. या औषधी जंगलात का फेकण्यात आल्या, याचे कोडे कायम आहे. विशेष म्हणजे, एखाद्या गरजू रूग्णाला रूग्णालयात औषधी मिळत नाही. पण ती जंगलात फेकली जाते. विशेष म्हणजे, ‘डेट’ संपली असेल तर अशा औषधीच्या संपुष्टाकरिता विशिष्ट प्रक्रिया राबवावी लागते. त्याचा अहवाल पाठवावा लागतो. यातून कुठलाही ससेमिरा नको, म्हणून औषधी फेकल्याची शक्यता आहे.हा प्रकार धोकादायक आहे. औषधांची विल्हेवाट लावण्यापूर्वी स्थानिक पातळीवरच्या समितीकडे हा विषय जातो. नंतर एका विशिष्ट पद्धतीने त्याची विल्हेवाट लावायची असते. औषधी उघड्यावर फेकल्याने नियमालाच बगल दिली आहे. ही औषधी कोणाची आहे, याचा शोध घेऊन कारवाई केली जाईल.- दुर्योधन चव्हाणजिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ
घातक रसायने उठली जंगलाच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 8:58 PM
घातक रसायनाच्या माध्यमातून फळे पिकविली जातात. हे रसायन मानवी आरोग्यासाठी घातक आहे. रसायनाच्या वापरानंतर उरलेले अवशेष पर्यावरणालाही घातक आहे. यामुळे ते कचरागाडीत टाकता येत नाही. कचरेवाला असा कचरा स्वीकारत नाही. अशा कचऱ्यामुळे थेट व्यापाऱ्यांवर कारवाई होण्याचा धोका असतो.
ठळक मुद्देदुर्लक्ष कुणाचे? : झाडांसह वन्यजीव आणि पक्षांना मोठा धोका