लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: आज समाजात वाढदिवस साजरा करण्याचा खर्चीक व बडेजावपणाची पद्धत रूढ होत आहे. मात्र या सर्व गोष्टीला फाटा देत येथील चिरडे परिवारातील डॉक्टर पुत्राने वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी व औषोधोपचार करून वडिलांची पासष्टी साजरी करीत समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला.दारव्हा येथील व्यावसायिक रमेशराव चिरडे यांचा मुलगा डॉ. सतीश हे हृदयरोग तज्ञ आहे. त्यांचे काका येथील माजी नगराध्यक्ष अशोकराव चिरडे यांच्या संकल्पनेतून रमेशराव यांचा वाढदिवस उमरी येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरले. यवतमाळच्या श्री दत्त हार्ट हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सतीश चिरडे हे त्यांचे सहकारी डॉ. अनिल घोडे व चमूसह वृद्धाश्रमात दाखल झाले. त्यांनी वृद्धाश्रमातील ९२ वृद्धांची आरोग्य तपासणी केली. यावेळी त्यांची ईसीजी, शुगर, रक्तदाब तपासण्यात येवून औषोधोपचार करण्यात आले. तसेच सर्व वृद्धांना वस्त्रदान व अन्नदान करण्यात आले. वृद्धांशी संवाद साधतांना व त्यांची सेवा करताना सारेच भारावून गेले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून वृध्दाश्रमाचे संचालक शेषराव डोंगरे व जयप्रकाश डोंगरे यांचा चिरडे परिवाराचे वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच वृध्दाश्रमाचे वतीने रमेशराव चिरडे व डॉ. सतीश चिरडे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. संस्मरणीय सोहळ्याला पुंडलिकराव चिरडे पांडुरंग निमकर, प्रल्हाद दुधे, धर्मेंद्र दुधे, सुनील आरेकर, सुभाष बदुकले यांच्यासह चिरडे परिवारातील लहानांपासुन तर जेष्ठ मंडळी व नातलग सामील झाले. संचालन व आभार आकाश चिरडे यांनी मानले .
वडिलांच्या पासष्टीनिमित्त वृद्धाश्रमात घेतले आरोग्य शिबीर; यवतमाळ जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:30 AM
चिरडे परिवारातील डॉक्टर पुत्राने वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी व औषोधोपचार करून वडिलांची पासष्टी साजरी करीत समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला.
ठळक मुद्देचिरडे परिवाराचा स्तुत्य कार्यक्रम