लोकमत न्यूज नेटवर्कझरी : आदिवासींच्या उत्थानासाठी काम करणारे वणी येथील डॉ.महेंद्र लोढा व झरी तालुक्यातील धर्माजी आत्राम यांना शुक्रवारी शासनातर्फे ‘आदिवासी मित्र पुरस्कार’ बहाल करण्यात आला.शिबला येथे पार पडलेल्या मोफत रोगनिदान व तसेच समाधान शिबिरात यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते डॉ.महेंद्र लोढा व बोटोणी येथील धर्माजी आत्राम यांनी हा पुरस्कार स्विकारला.शिबला येथे शुक्रवारी ‘सरकार आपल्या दारू-समाधान शिबिर’ व मोफत सर्व रोगनिदान, उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. समाधान शिबिरात आदिवासी योजना, आरोग्य योजना, पाणी, रोजगार, वीज रस्त्याच्या समस्यां नागरिकांनी मांडल्या. पालकमंत्री मदन येरावार यांनी अधिकाºयांच्या माध्यमातून या समस्यांचे निराकरण केले. यानिमित्त आयोजित मोफत रोगनिदान शिबिरात दोन हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ८० रुग्णांवर विविध आजारासंदर्भात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. या सर्व शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून केल्या जाणार आहेत. शिबिरात डॉ.महेंद्र लोढा, डॉ.गणेश लिमजे, डॉ.सुनिलकुमार जुमनाके, डॉ.मनिषा जुमनाके, डॉ.विणा चवरडोल, डॉ.मनिष भगत, डॉ.सुबोध अग्रवाल, डॉ.पाटील, अनिरुद्ध वैद्य, डॉ.अशोक कोठारी, डॉ.किशोर व्यवहारे, डॉ.अमोल पदलमवार, डॉ.पल्लवी पदलमवार यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात नागपूर येथील लाईफ लाईन ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराला जिल्हा अंधत्व निवारण समिती, जिल्हा शल्यचिकीत्सक यवतमाळ, ग्रामीण रुग्णालय झरी, प्राथमिक आरोग्य केंद्र मुकुटबन, शिबला व झरीचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे झरी तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे भव्य शिबिर पार पडले.
आरोग्य तपासणी व समाधान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 2:04 AM
आदिवासींच्या उत्थानासाठी काम करणारे वणी येथील डॉ.महेंद्र लोढा व झरी तालुक्यातील धर्माजी आत्राम यांना शुक्रवारी शासनातर्फे ‘आदिवासी मित्र पुरस्कार’ बहाल करण्यात आला.
ठळक मुद्देशिबला येथे आयोजन : महेंद्र लोढा, धर्माजी आत्राम यांना आदिवासी मित्र पुरस्कार