प्राथमिक आरोग्य केंद्र, मार्डी येथे आयोजित कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी एस. के. निकाळजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पायल पवार, सरपंच रविराज चंदनखेडे, पोलीसपाटील डॉ. प्रशांत पाटील, उपसरपंच प्रफुल्ल झाडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पारस्कर, मंडल कृषी अधिकारी ए. डी. कनाके उपस्थित होते. शिबिराला तालुक्यातील मार्डी, चोपण, गाडेगाव, मजरा, चनोडा, खैरगाव, पहापळ, वनोजा येथील शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते. आरोग्य तपासणी करून मजुरांनी सुरक्षित फवारणी करताना घ्यावयाची काळजी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, मास्कचा वापर करणे, वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी, सकाळी फवारणी करावी, फवारणी झाल्यावर आंघोळ करावी, कपडे बदलावे, बिडी, तंबाखू यांचे सेवन करू नये, आदींबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता कृषी सहाय्यक डी. ए. गाडगे, ए. यू. सोनुले, आर. सयाम, जी. कोल्हे, पी. कचाटे, गणेश पेंदोर, कृषिमित्र अशोक निमसटकार, मुकुंदा निवल, विजय खिरटकर आदींनी परिश्रम घेतले.
मार्डी येथे शेतकरी, शेतमजुरांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:46 AM