लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन सभापती पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत डॉक्टरांची रिक्त पदे, शिक्षण विभागातील गोंधळ आणि पाणीटंचाईचा विषय सदस्यांच्या रडारवर आहे.लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच सर्वसाधारण सभा होत आहे. दरम्यानच्या काळात सर्वांनी मिळून बांधकाम सभापती निमीष मानकर यांच्यावर अविश्वास ठराव पारित केला. तसेच शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्यावरही ४७ सदस्यांनी अविश्वास दर्शविला. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अविश्वासासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्टÑवादी एकत्र आल्याने जिल्हा परिषदेत विरोधकच उरले नाही. सध्याच्या घडीला केवळ निमीष मानकर आणि नंदिनी दरणे हे दोनच सदस्य विरोधात असल्याचे दिसून येते. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. गरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. शिक्षण विभागाच्या गोंधळावरून स्थायी समिती सभेत खडाजंगी झाली होती. याशिवाय टँकर बंद केल्याने पाणी प्रश्नही गंभीर बनला आहे. या तीन महत्वाच्या समस्यांवर सदस्य नेमकी कोणती भूमिका घेतात याबाबत औत्सुक्य आहे. विरोधकच उरले नसल्याने आता सत्ताधाऱ्यांनाच प्रशासनाला जाब विचारावा लागणार आहे. तथापि नवीन पदांवर डोळा ठेऊन सदस्यांंची आक्रमकता कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नवीन सभापतींची २१ जूनला निवडबांधकाम व अर्थ आणि शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापतीपदासाठी २१ जूनला निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही दोन्ही पदे सध्या रिक्त आहे. २१ जूनला ११ वाजता या पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. लगेच तासाभरानंतर नवीन सभापतींसाठी निवडणूक घेतली जाणार आहे.अधिकाऱ्यांपुढे सर्वच हतबलजिल्हा परिषदेचे अधिकारी खुद्द पदाधिकाºयांचेही ऐकत नाही, अशी हतबलता पदाधिकाºयांनीच व्यक्त केली. यामुळे जिल्ह्यातील महत्वाच्या समस्या सुटणार कशा असा प्रश्न निर्माण झाला आहे. पदाधिकारी व सदस्यांनी या तीनही महत्वाच्या समस्या सोडवाव्यात अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे.
आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा सदस्यांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 9:43 PM
दोन सभापती पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत डॉक्टरांची रिक्त पदे, शिक्षण विभागातील गोंधळ आणि पाणीटंचाईचा विषय सदस्यांच्या रडारवर आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : विरोधक उरलेच नाही, डॉक्टरांची पदे रिक्त, शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळच गोंधळ