शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

पुसद तालुक्यात दमदार पाऊस

By admin | Published: July 09, 2014 11:54 PM

पुसद शहरासह परिसरात मंगळवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला होता. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला निसर्गाची कृपा झाली

पुसद : पुसद शहरासह परिसरात मंगळवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला होता. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला निसर्गाची कृपा झाली आणि पिकांना जीवदान मिळाले. दमदार पावसाने बळीराजा सुखावला आहे. मृगानंतर आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता. मात्र बळीराजा पुनर्वसू नक्षत्राने संकटातून बाहेर काढले आहे. मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पुसद शहरासह परिसरात दमदार पाऊस झाला. दोन तास चांगला नंतर रात्री ९ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी झाला. एक महिना पावसाची वाट पाहावी लागली. पेरण्या पूर्णत: खोळंबल्या होत्या. अखेर पंढरपूरचा विठोबा बळीराजाच्या मदतीला धावून आला. मंगळवारी सायंकाळी दोन तास दमदार पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहून जात होते. विशेषत: सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ झाल्याचे दिसून आले. मात्र या पावसाने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. शहरात रात्री पुसद शहरासह शेलू, चिल्लवाडी, पोखरी, वरुड, आरेगाव, सावंगी, निंबी, पार्डी, बोरी, बोरगडी, मांडवा, सांडवा, शेंबाळपिंपरी, कार्ला, माणिकडोह, धुंदी, काटखेडा, हर्षी, शिळोणा, नंदपूर, मोहा आदी भागातही चांगला पाऊस झाला. गतवर्षी जेथे जून महिन्यात १४ जून रोजी पूस धरण ओव्हरफ्लो झाले होते. तर जून महिन्यात ३५० मि.मी.पावसाची नोंद झाली होती. यावर्षी ९ जुलैपर्यंत ३२ मि.मी. एवढाच पाऊस झाला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याचा पहिला आठवडासुद्धा कोरडा गेल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ग्रामीण भागात पेरणीची कामे खोळंबली होती. परंतु आता पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)