शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

उमरखेड, महागावला धुवाँधार पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 5:00 AM

कुपटी येथील एक युवक नाल्याच्या पुरात वाहून गेला हाेता. मात्र त्याला वाचविण्यात यश आले. उमरखेड तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बंदी भागातील ढाणकी, गांजेगाव, बिटरगाव, कुपटी, दहागाव आदी परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला. उमरखेड ते पुसद मार्गावरील दहागाव नजीक नाल्याचे पाणी पुलावरून वाहत होते. त्यात कुपटी येथील विजय दत्ता इलतकर हा युवक वाहून गेला.

ठळक मुद्देनदी, नाले तुडुंब : कुपटी येथील वाहून गेलेला युवक बचावला, ७८० हेक्टर शेतात नुकसान, ४० घरांची पडझड

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड/महागाव : बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने उमरखेड आणि महागाव तालुक्याला तडाखा दिला. दोन्ही तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. पैनगंगा नदीलाही पूर आला आहे. उमरखेड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कुपटी येथील एक युवक नाल्याच्या पुरात वाहून गेला हाेता. मात्र त्याला वाचविण्यात यश आले. उमरखेड तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बंदी भागातील ढाणकी, गांजेगाव, बिटरगाव, कुपटी, दहागाव आदी परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला. उमरखेड ते पुसद मार्गावरील दहागाव नजीक नाल्याचे पाणी पुलावरून वाहत होते. त्यात कुपटी येथील विजय दत्ता इलतकर हा युवक वाहून गेला. एका झाडाच्या आश्रयाने त्याने काही काळ तग धरला. याची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासन व नागरिकांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. पावसामुळे ढाणकी ते हिमायतनगर, उमरखेड ते पुसद आदी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. उमरखेड येथून ढाणकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. पैनगंगा अभयारण्य परिसरातील ४० गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या धनोडा येथील पैनगंगा नदी काठोकाठ भरली आहे. सहस्त्रकुंड धबधबा खळाळून वाहत आहे. या पावसामुळे उमरखेड व महागाव तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, उमरखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर परिस्थितीवर नजर ठेवून आहे.  मात्र पाऊस अजूनही कायमच आहे.  

नागरिकांनी घाबरू नये. पुलावरून पाणी वाहत असताना मार्गक्रमण करू नये. सर्वांनी सुरक्षित राहावे. प्रशासन सतर्क असून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. - आनंद देऊळगावकरतहसीलदार, उमरखेड

 

टॅग्स :floodपूरRainपाऊस