शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, नदी-नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2022 11:09 AM

यवतमाळ व गोंदिया जिल्ह्याच्या विविध भागांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

 

यवतमाळ / गोंदिया : यवतमाळ व गोंदिया जिल्ह्याच्या विविध भागांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यात सर्वाधिक ५४.३ मिमी पाऊस झाला असून, सर्वात कमी ४.५ मिमी पाऊस उमरखेडमध्ये नोंदविला आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ९ लाख ५८ हजार हेक्टर आहे. त्यातील ३ लाख ३८ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या होत्या. मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे या पेरण्यांना आता वेग आला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

गोंदिया जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८१ मिमी पावसाची नोंद झाली असून, गोंदिया, तिरोडा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव या चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तिरोडा आणि सडक अर्जुनी तालुक्यात झालेल्या पावसामुळे या तालुक्यातील काही मार्ग बंद झाले होते.

सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी - खोडशिवणी मार्गावरील पूल वाहून गेल्याने या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. तर बाम्हणी-दल्ली मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्गसुद्धा बंद झाला होता. चूलबंद नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठालगत असलेल्या गावांना याचा फटका बसला होता. जिल्ह्यात सर्वाधिक १५० मिमी पावसाची नोंद सडक अर्जुनी तर त्या पाठोपाठ १४० मिमी पावसाची नोंद तिरोडा तालुक्यात वेढ झाली होती.

दमदार पावसामुळे तिरोडा शहरातील काही वस्त्यांना पाण्याचा वेढा घातल्याचे चित्र होते. जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे. 

पुरात वाहून गेलेल्याचा मृतदेह सापडला

गडचिरोली जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने छोट्या नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यातच सोमवारी आरमोरी तालुक्यातील वसा येथे कोलांडी नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेलेला एक इसम वाहून गेला होता. मंगळवारी त्याचा मृतदेह सापडला. राजकुमार एकनाथ राऊत (वय ३८) असे त्या मृताचे नाव आहे. गडचिरोलीच्या ४ तालुक्यांत तिवृष्टीची नोंद झाली. 

वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस आर्वी तालुक्यात

जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. आर्वी येथे १७४.४ मि.मि., वाठोडा येथे १११ मि.मि., वाढोणा येथे १०३ मि.मि., विरूळ येथे १२८.३ मि.मि., रोहणा येथे १५४ मि.मि. तर खरांगणा येथे ६८.४ मि.मि. पाऊस रविवार झाला. जिल्ह्यात १४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची अतिवृष्टी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आर्वी तालुक्यात कुठेही जिवितहानी झाली नसली तरी ३५ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. आठ गोठे पडले आहे. वाठोडा, देऊळवाडा सांझातील ११० कुटूंबांच्या घरात पाणी घुसले होते. या पुरग्रस्त भागाला उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदारांनी भेट दिली. नदीकाठावरील १ हजार हेक्टर पिकाचे नुकसान आर्वी तालुक्यात झालेले आहे. जिल्ह्यातील सेलू, वर्धा, देवळी, आर्वी या तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. आर्वी तालुक्यातील ५४ गावातील २६५ कुटूंब बाधित झाले तर देवळी तालुक्यात २ गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. देवळी तालुक्यात तसेच आर्वी तालुक्यात अनेक ठिकाणी लहान पूल तसेच पुलालगतचा भराव वाहून गेल्याने वाहतुकही बंद पडली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरweatherहवामान