शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

नेर, यवतमाळमध्ये पावसाची मुसळधार एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 5:00 AM

सोमवारी रात्री १ वाजताच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. यवतमाळ शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तलावफैलातील गवळीपुरा, बेंडकीपुरा येथील मुख्य नाली तलाव सौंदर्यीकरणाच्या कामामुळे बंद झाली. यामुळे पावसाचे पाणी परिसरातील १३ घरांमध्ये शिरले. तेथील नागरिकांना संपूर्ण रात्र बाहेर काढावी लागली. मोठे आर्थिक नुकसानही झाले. पावसामुळे धोका उद्भवणार याबाबत येथील नगरसेवक गजानन इंगोले यांनी नगरपालिका प्रशासनाला सुचित केले होते.

ठळक मुद्देनदी-नाल्यांना पूर : नेर तालुक्यातील मिलमिली नदीसह यवतमाळ शहरातही सखल भागात साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या २४ तासात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी ८.५ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस नेर तालुक्यात झाला आहे. २४ तासात तेथे ५६.६ मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळला. त्या खालोखाल यवतमाळ तालुक्यात २०.१ मिमी पाऊस झाला. या दोन्ही ठिकाणी पावसाने शेतीचे नुकसान केले. नेरमधील पिंपरी, धनज माणिकवाडा, पाथ्रडगोळे, मांगलादेवी या गावांना चांगलाच तडाखा बसला. नेर शहरालगतच्या मिलमिली नदीलाही पूर आला होता.सोमवारी रात्री १ वाजताच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. यवतमाळ शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तलावफैलातील गवळीपुरा, बेंडकीपुरा येथील मुख्य नाली तलाव सौंदर्यीकरणाच्या कामामुळे बंद झाली. यामुळे पावसाचे पाणी परिसरातील १३ घरांमध्ये शिरले. तेथील नागरिकांना संपूर्ण रात्र बाहेर काढावी लागली. मोठे आर्थिक नुकसानही झाले. पावसामुळे धोका उद्भवणार याबाबत येथील नगरसेवक गजानन इंगोले यांनी नगरपालिका प्रशासनाला सुचित केले होते. मात्र पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.दीर्घ उघाडीनंतर पावसाने जिल्ह्यात पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार झरीजामणी, केळापूर, घाटंजी हे तीन तालुके वगळता सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मांगलादेवीजवळील मिलमिली नदीला पूर आला. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मांगलादेवी येथील शेतकरी प्रदीप उंबरे, मनोज उमरतकर, अनिल पुनसे, भरत कुंभारखाने, अरविंद इळपाते आदींनी नेर तहसीलदारांना निवेदन दिले.पाथ्रडगोळेमध्ये बैल वाहून गेलानेर तालुक्यातील पाथ्रडगोळे येथे मुसळधार पावसाने लगतच्या नाल्याचे पाणी गावात व शेतात शिरले. यात गोठ्यात बांधून असलेला बैल वाहून गेला. संत्रा, कपाशी, सोयाबीन, भेंडी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावातील तुषार गावंडे, पवन गावंडे, दिलीप गावंडे, श्रीकृष्ण गावंडे, विकास गावंडे यांच्यासह इतरही शेतकऱ्यांचे जमीन खरडल्याने नुकसान झाले.धनज, मुखत्यारपूर येथे ढगफुटी सदृश पाऊससोमवारी रात्री २ वाजताच्या सुामरास धनज, मुखत्यारपूर (ता.नेर) येथे जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक ढगफुटीसारखा पाऊस कोसळायला लागला. त्यामुळे लहान-मोठ्या नाल्यांना पूर आला. शेतशिवारातही पाण्याचे लोंढे वाहून लागले. अनेक शेतकांना तलावाचे स्वरूप आले होते. मंगळवारी दुपारपर्यंत पाण्याचा निचरा झालेला नव्हता. पंजाबराव खोडके, करीम खॉ, एकनाथ तिखे, संदीप भांगे, सुनील ढोकणे, रवींद्र बनसोड, राजीव तिखे, कैलास तिखे, नितीन इंगळे, राजीव जोल्हे, सुभाष लुनावत, जमीर मिर्झा, किशोर अलोणे, रवींद्र दाभोरे, संभादास कळसकर यांच्या शेताचे नुकसान झाले. 

टॅग्स :Rainपाऊस