लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : येथून १४ कि.मी.वर असलेलं ७५० लोकसंख्येचं सारफळी गाव पाण्याच्या भीषण समस्येने होरपळून निघत आहे. नळ योजनेच्या विहिरीची पातळी खाली गेली. हातपंप कोरडे पडले. आता टँकरवर काम आलं आहे. दररोज २४ हजार लिटर पाणी या गावातील चार विहिरीत टाकले जाते. गावात टँकर पोहोचते त्यावेळी विहिरीवर होणारी गर्दी जीवघेणी ठरते. पाणी मिळविण्यासाठी लोकांची मोठी धडपड सुरू होते. पाणी अपुरे पडत असल्याने टँकर वाढविण्याची मागणी सरपंच निर्मला कुंभेकर, उपसरपंच तेजस गावंडे यांनी केली आहे. या गावात कायमस्वरूपी उपाययोजनांचे अनेक प्रयोग फेल गेले. नाल्याशेजारी असलेल्या विहिरीचा पाझर तेवढा आधार आहे. याशिवाय बाभूळगाव तालुक्यातील घारफळ, दाभा, येरंडगाव, यावली, सुकळी, तरोडा, वाई, आलेगाव ही गावे संभाव्य पाणीटंचाईच्या यादीत आहे. पुढील काळात पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मुक्या जीवांची सेवासारफळी गावात मुक्या जीवांच्या पाण्याचा प्रश्नही भीषण आहे. गावशिवारातून वाहणारे ओढे कोरडे पडले आहे. अशावेळी जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. मात्र श्रीकांत वखरे यांनी ही सोय करून दिली आहे. गेली दोन वर्षांपासून ते जनावरांची तृष्णातृप्ती व्हावी यासाठी पाणी उपलब्ध करून देत असल्याचे उपसरपंच तेजस गावंडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.
टँकरची वारी सारफळीत लय भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 9:27 PM
येथून १४ कि.मी.वर असलेलं ७५० लोकसंख्येचं सारफळी गाव पाण्याच्या भीषण समस्येने होरपळून निघत आहे. नळ योजनेच्या विहिरीची पातळी खाली गेली. हातपंप कोरडे पडले. आता टँकरवर काम आलं आहे. दररोज २४ हजार लिटर पाणी या गावातील चार विहिरीत टाकले जाते.
ठळक मुद्देनागरिकांचा टाहो । विहिरींनी तळ गाठला, हातपंप कोरडे, प्रश्न गंभीर