यवतमाळ : काल रात्री यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यवतमाळ तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
जिल्ह्यातील काही भागात रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आल्याने रस्त्यावर पाणी वाहू लागले. सध्या शेतात गहू ,हरभरा,आंबा या पिकांना फटका बसला आहे.. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णता हतबल झाले.
पावसाच्या आगमनाने शेतकऱ्याचं जीव टांगणीला लागलेल आहे. खरीप पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. त्यात रब्बी पिकावर भिस्त होती. ती अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणाने हिरावली. आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.