सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ‘हेल्प अॅन्ड लर्न पॅटर्न’ तयार केला. यात पदवीच्या पहिल्या वर्षीपासूनच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपचारपद्धती जवळून पाहता येणार आहे. त्यासाठी अपघात विभागात विद्यार्थ्यांची चमू आठवड्यातून काही दिवस ‘हेल्पींग हॅन्ड’ म्हणून उपस्थित राहणार आहे.‘मेडिकल’च्या अपघात कक्षात सतत धावपळ असते. डॉक्टरांना कक्षसेवकही कमी पडतात. अशा स्थितीत अपघातातील जखमी मोठ्या प्रमाणात आल्यास तारांबळ उडते. विषबाधेसह नानाविविध प्रकारचे रुग्ण येथे येतात. त्यामुळे आता पहिल्या वर्षापासूनच उपचार प्रत्यक्ष कसे केले जाते, याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. शिवाय या विद्यार्थ्यांची मदतही अपघात कक्ष वैद्यकीय अधिकाऱ्याला होणार आहे.अपघात कक्षात एकावेळी १७ विद्यार्थ्यांची चमू ठेवण्यात येत आहे. अगदी पेशंटला स्ट्रेचरवर टाकून आणणे, त्याला विविध चाचण्यांसाठी घेऊन जाणे, अशी साधी कामे विद्यार्थी करणार आहे. त्यांना अपघात कक्षात काही तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. यात इसीजी कसा काढायचा, बीपी आॅपरेटर हाताळणे, आयव्ही लावणे, सेक्शन मशीनचा वापर, व्हेंटीलेटर लावणे याबाबत त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष उपचार कसा होतो, हे विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहे.हा पॅर्टन अधिष्ठाता डॉ.मनीष श्रीगिरीवार यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आला. सुरूवातीला प्रतिसाद मिळत नव्हता. विद्यार्थ्यांना सक्ती करावी लागत होती. मात्र आता याचा लाभ लक्षात आल्याने विद्यार्थी स्वत:च आलेल्या रुग्णांची सुश्रृषा करीत असल्याचे अधिष्ठाता डॉ.श्रीगिरीवार यांनी सांगितले. हा पॅटर्न सहज राबविता येण्याजोगा आहे.पोर्टेबल बायोमेट्रिकवर अटेंडन्सवैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या अटेंडन्साठी बायोमेट्रिक मशीन लावण्यात आले होते. मात्र यात जाणीपूर्वक बिघाड करून दांडी मारली जात होती. हा प्रकार थांबविण्यासाठी आता थेट पोर्टेबल बायोमेट्रीक मशीन वापरले जाणार आहे. प्रत्येक वर्गात प्रशासनातील कर्मचारी जाऊन विद्यार्थी व प्राध्यपकांची उपस्थिती घेणार आहे. यामुळे आता दांडी बहाद्दरांना चाप बसणार आहे.
मेडिकलमध्ये हेल्प अॅन्ड लर्न पॅर्टन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 10:34 PM
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ‘हेल्प अॅन्ड लर्न पॅटर्न’ तयार केला. यात पदवीच्या पहिल्या वर्षीपासूनच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपचारपद्धती जवळून पाहता येणार आहे. त्यासाठी अपघात विभागात विद्यार्थ्यांची चमू आठवड्यातून काही दिवस ‘हेल्पींग हॅन्ड’ म्हणून उपस्थित राहणार आहे.
ठळक मुद्देपहिलाच प्रयोग : पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्याक्षिकावर भर