संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : प्रत्येकाचा मृत्यू एकदा ठरलेला आहे. निधनानंतर मृताला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याच्या आप्तस्वकीयांची गर्दी होते. पण काहींच्या नशिबात ही गर्दी नसते. ही माणेस एकाकी मरतात. अखेरच्या क्षणी त्यांच्या नशिबी हक्काचे ‘कफन’देखील नसते. अशा बेवारस मृतांसाठी मग ‘तो’ स्वत:हून धाऊन जातो. स्वखर्चाने अंत्यसंस्काराचे सारे सोपस्कर तो स्वत: पुढे होऊन पार पाडतो.विजय शंकरराव कडुकर असे या भल्या माणसाचे नाव. गेल्या सात वर्षांत वणी, मुकुटबन पाटण, मारेगाव, शिरपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी या भागातील १२५ पेक्षा अधिक मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच सत्कार्य विजय कडुकर यांच्या हातून घडलं आहे. काही वर्षांपूर्वी भद्रावती येथील एक बेवारस मृतदेह वणी परिसरात आढळून आला होता. मृतदेह इतका छिन्नविछिन्न होता की, त्यावर अंतसंस्कारासाठीही कुणी पुढे येईना. कडुकर यांना त्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच पोलिसांशी संपर्क करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयार दाखविली. येथूनच त्यांच्या या अनोख्या सेवा कार्याला प्रारंभ झाला. त्यांच्या या सत्कार्याची ख्याती पंचक्रोशीत आहे. त्यामुळे कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस मृतदेह आढळला की, विजय कडुकर यांना अंत्यसंस्कारासाठी बोलावणं येतं. कडुकरदेखील कुठलेही आढेवेढे न घेता, या सत्कार्यासाठी पुढे येतात. यासाठी नवकार योगा ग्रुपचे किरण दिकुंडवार, तारेंद्र बोर्डे तसेच समाजसेवक नारायण गोडे विशेष सहकार्य मिळते, असे कडुकर यांनी सांगितले.त्यांचं काम एवढ्यावरच थांबलेलं नाही, तर दरवर्षी ते वणी परिसरातील गरीब गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं स्वखर्चातून वितरण करतात. त्यांनी मरणोपरांत स्वत:चे डोळे, लिव्हर, हृदय आणि किडणीसुद्धा दान केली आहे. स्वत:च्या मिळकतीतील २० टक्के उत्पन्न ते दरवर्षी केवळ समाजासाठी खर्च करतात, हे विशेष. त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
येथे बेवारस मृतदेहांवर चढविले जाते मानवतेचे कफन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 5:00 AM
प्रत्येकाचा मृत्यू एकदा ठरलेला आहे. निधनानंतर मृताला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याच्या आप्तस्वकीयांची गर्दी होते. पण काहींच्या नशिबात ही गर्दी नसते. ही माणेस एकाकी मरतात. अखेरच्या क्षणी त्यांच्या नशिबी हक्काचे ‘कफन’देखील नसते. अशा बेवारस मृतांसाठी मग ‘तो’ स्वत:हून धाऊन जातो. स्वखर्चाने अंत्यसंस्काराचे सारे सोपस्कर तो स्वत: पुढे होऊन पार पाडतो. विजय शंकरराव कडुकर असे या भल्या माणसाचे नाव.
ठळक मुद्देशेकडो मृतदेहांवर अंत्यसंस्कार : वणीतील समाजसेवी व्यक्तीचा अनोखा उपक्रम