यवतमाळ : विकास आराखड्यामुळे ऐतिहासिक आझाद मैदानाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर उच्च न्यायालयाद्वारे नियुक्त आयुक्त दीपक ठाकरे यांनी शनिवारी या मैदानाची पाहणी केली. आझाद मैदान वाचविण्यासाठी अॅड़ जयसिंह चव्हाण यांनी मे २०१५ मध्ये जनहित याचिका दाखल केली. त्या अनुषंगाने न्या. भुषण गवई व न्या. पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठाने आयुक्ताची पाहणीसाठी नियुक्ती केली. शनिवारी आयुक्तांनी प्रत्यक्ष आझाद मैदानाला भेट देऊन प्रस्तावित विकास आराखड्याची पाहणी केली. यावेळी याचिकाकर्ते अॅड़ जयसिंह चव्हाण, किशोर पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे यवतमाळ येथील कार्यकारी अभियंता चंद्रशेखर मेहेत्रे उपस्थित होते. आयुक्तांच्या अहवालावरून या प्रकरणाचा निपटारा होणार आहे. २८ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
हायकोर्ट आयुक्त पाहणीसाठी आझाद मैदानात
By admin | Published: March 20, 2016 2:14 AM