ध्वज उंच धरू या : भारतीय स्वातंत्र्य सत्तरीत पोहोचले. लोकशाही प्रगल्भ झाली. अधूनमधून राजकीय वादंगाचा धुरळा उडत असतोच म्हणा, पण राष्ट्रीय अस्मिता शाबूत आहे. शाबूत राहणार आहे. भारतीयत्वाचा हाच जाज्वल्य अभिमान घेऊन पुढची पिढीही सज्ज होतेय. स्वातंत्र्यासोबत समता-बंधूतेचे बाळकडू मिळतेय. म्हणूनच कुणी अडखळत असेल तर मदतीचे इवले-इवले हात सरसावतात. बोदड येथील जिल्हा परिषद शाळेची रविना राजू पारधी या पाचवीतील दिव्यांग विद्यार्थिनीला दररोज तिच्या मैत्रिणी असा आधार देतात, तेव्हा ‘सबका साथ सबका विकास’ हे तत्त्व प्रत्यक्षात येणार.
ध्वज उंच धरू या :
By admin | Published: August 15, 2016 1:17 AM