लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कुठल्याही सुरक्षेविणा सुरू असलेल्या येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातून बुधवारी पहाटे दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या एका नवजात बालकाचे अपहरण करण्यात आले. या घटनेनंतर वणी पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत अवघ्या चार तासांत तेलंगाणातील आसिफाबाद येथून अपहरणकर्ते आणि अपहृत बालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर अपहृत बालकाला सुखरूप त्याच्या मातेच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनाक्रमामुळे हादरून गेलेल्या वणीकरांसह पोलीस व रुग्णालय प्रशासनाचा जीव भांड्यात पडला.मूळची वणी येथील रहिवासी असलेल्या नुसरत जबीन शेख या महिलेचा विवाह दीड वर्षांपूर्वी हिंगणघाट येथील अब्दुल गफ्फार या युवकाशी झाला होता. त्यानंतर ती काही दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी वणी येथे माहेरी आली होती. दरम्यान, प्रसवकळा सुरू झाल्याने सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास नुसरतला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती करण्यात आले. त्यानंतर सकाळी ७ वाजताच्या सुमारास तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.हे दोघेही मायलेक ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती कक्षात भरती होते. बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास नुसरतला अचानक जाग आली, तेव्हा तिच्या शेजारी बाळ दिसून आले नाही. त्यामुळे ती हादरली. तिने इकडे-तिकडे चौैकशी केली. मात्र बाळ सापडले नाही. यासंदर्भात सकाळी ५ वाजता नुसरतचा पती अब्दुल गफ्फार शेख याने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला.उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार बाळासाहेब खाडे, डी.बी.पथक व पोलीस कर्मचारी ग्रामीण रुग्णालयात पोहचले आणि अपहरणकर्त्यांचा शोध सुरू झाला.पोलीस उल्हास ठरला ‘हिरो’सध्या वणी तालुक्यातील रासा बीटमध्ये कार्यरत नायक पोलीस शिपाई उल्हास कुरकुटे खºया अर्थाने ‘हिरो’ ठरला. काही दिवसांपूर्वी वणी पोलीस ठाण्याच्या डी.बी.पथकात कार्यरत असलेला उल्हास वरिष्ठांच्या आदेशावरून अपहरण प्रकरणाच्या तपास कामात गुंतून असताना एका ‘फंटर’ने मोबाईलवरून अपहरण कांडामागे असलेल्या सूत्रधारासंदर्भात त्याला माहिती दिली. उल्हासने लगेच ही माहिती ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना दिली. त्यानंतर प्रकरणाचे बिंग फुटले आणि पोलिसांना अपहरणकर्त्यांपर्यंत पोहचता आले. एकूणच उल्हासचे नेटवर्कींग प्रकरणाच्या तपासात अतिशय मोलाचे ठरले. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, वणीचे एसडीपीओ विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार बाळासाहेब खाडे, जमादार अरुण नाकतोडे, सुदर्शन वानोळे, आनंद आलचेलवार, नफीस शेख, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, दीपक वांड्रसकर, इम्रान खान यांनी पार पाडली. अशोक काकडे व उल्हास कुरकुटे तपास करीत आहेत.रुग्णालयातील सफाई कामगारच निघाले अपहरणकर्तेवणीच्या ग्रामीण रुग्णालयात रोजंदारीने सफाई काम करणाºया दोन युवकांनीच नवजात बाळाचे अपहरण केल्याची बाब चौैकशीत उघड झाली. केवळ ६० हजार रुपयांसाठी त्यांनी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. वणीतील रमेश केशव कुंभारकर याचा साळा राजू रामलू बडावत हा तेलंगाणा राज्यातील मंचेरियल येथील रहिवासी आहे. त्याला मूलबाळ नाही. त्यामुळे राजू बडावत हा एखादे बाळ दत्तक घेण्याच्या तयारीत होता. मात्र ते मिळत नव्हते. यादरम्यान, रमेशने शक्कल लढविली. वणीच्या ग्रामीण रुग्णालयातून एखादे नवजात बाळ पळविण्याचा कट त्याने रचला. त्याने हे काम करण्याची सुपारी गणेश वाघमारे व श्रीकांत चुनारकर यांना दिली. यासाठी ६० हजार रुपयांचा सौदा करण्यात आला. त्यातील ३० हजार रुपयांची रक्कम त्यांना काम होण्याअगोदरच देण्यात आली. गणेश आणि श्रीकांत हे रुग्णालयातच काम करीत असल्याने त्यांनी संधी साधून बुधवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास नुसरतचे बाळ लंपास केले. त्यानंतर हे बाळ रमेश कुंभारकर यांच्या ताब्यात दिले. रमेशने ते बाळ चार दिवसांपासून वणीत थांबून असलेल्या राजू बडावत व त्याची पत्नी शारदा बडावत यांच्या स्वाधीन केले. या दाम्पत्याने बाळ हाती मिळताच, वणीतून पहाटे ५ वाजता तेलंगाणातील मंथनीकडे जाणाºया बसमधून आसिफाबादकडे पलायन केले.
वणीतील अपहृत बाळ तेलंगणात सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:20 PM
कुठल्याही सुरक्षेविणा सुरू असलेल्या येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातून बुधवारी पहाटे दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या एका नवजात बालकाचे अपहरण करण्यात आले.
ठळक मुद्देग्रामीण रुग्णालयातून झाले अपहरण : ६० हजारात सौदा, चार तासात लावला गुन्ह्याचा छडा