लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. पदाधिकारी आणि प्रशासनाचा समन्वय साधत त्यांना या आव्हानांना समोरे जावे लागणार आहे.तत्कालीन सीईओ दीपक दीपक सिंगला आणि पदाधिकारी व सदस्य यांच्यात बिनसले होते. सिंगला यांच्यावर अविश्वासाची हालचाल सुरू झाली होती. हा कटुप्रसंग टाळण्यासाठी अखेर त्यांची येथून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी रूजू झालेले जलज शर्मा यांच्यापुढे आता पदाधिकारी, सदस्य आणि प्रशासनाचा ताळमेळ बसवून जिल्हा परिषदेचा मंदावलेला गाढा पुढे नेण्याचे प्रमुख आव्हान आहे. प्रशासनाची विस्कटलेली घडी बसवून त्यांना गतीमान प्रशासनाची मुहूर्तमेढ रोवायची आहे.जिल्हा शौचालय बांधणीत राज्यात सर्वात मागे आहे. ही बाब ओळखून शर्मा यांनी शौचालय बांधणीला प्राधान्य देत त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी एकाच दिवशी दहा हजार शौचालये बांधण्याचा उपक्रम त्यांनी राबविला. आता पाणीटंचाई ही प्रमुख समस्या आहे. तातडीने उपाययोजना करून जनतेला पाणी देण्याची गरज आहे. कृषी, आरोग्य, घरकूल योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे, समाजकल्याणचे साहित्य लाभार्थ्यांना देण्याचे आव्हान आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक योजनांची गती मंदावली आहे. त्याला चालना देण्याची गरज आहे.पहिल्याच सभेला सीईओंची अनुपस्थितीविधीमंडळाची आश्वासन समिती आल्याने सीईओ १० जानेवारीला उमरखेडला गेले होते. त्याच दिवशी तहकूब सर्वसाधारण सभा होती. परिणामी पहिल्याच सभेला शर्मा अनुपस्थित होते. तत्पूर्वी ५ जानेवारीला त्यांनी स्थायी समितीत काही काळ हजेरी लावली. मात्र पदाधिकारी, सदस्यांना सर्वसाधारण सभेत त्यांच्या उपस्थितीची उत्सुकता होती. आता सदस्य आणि त्यांची भेट व ओळख पुढील सर्वसाधारण सभेतच होण्याची शक्यता आहे.
सीईओंसमोर आव्हानांचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:17 PM
जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. पदाधिकारी आणि प्रशासनाचा समन्वय साधत त्यांना या आव्हानांना समोरे जावे लागणार आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : शौचालय, पाणीटंचाईची समस्या