ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मंगळवारी शासकीय व निमशासकीय कर्मचाºयांनी तिरंगा चौकात धरणे आंदोलन केले.राज्य शासनाने नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाºयांना पेन्शन बंद केली आहे. त्याऐवजी नवी पेन्शन योजना लागू केली. ही पेन्शन योजना रद्द करून सरसकट सर्वांना जुनीच पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कर्मचाºयांनी केली. तसेच सातवा वेतन आयोग लागू करणे, कंत्राटी पद्धतीची भरती बंद करणे, कर्मचारी कपात बंद करणे, महिला बाल संगोपन रजा मंजूर करणे आदी मागण्यांसाठी तिरंगा चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पाटबंधारे विभाग, शासकीय तंत्रनिकेतन, वन विभाग, शिक्षण विभाग, मेल नर्सेस ब्रदर संघटना आदींच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेतला. मागणीचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांना देण्यात आले. निवेदन देताना नंदकुमार बुटे, मंगेश वेध, आशिष जयसिंगपुरे, ज्ञानेश्वर नाकाडे, किशोर पोहनकर, नदीम पटेल, मिलिंद सोळंके, गजानन देऊळकर, विजय साबापुरे, संदीप क्षीरसागर यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
जुन्या पेन्शनसाठी धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:24 PM
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मंगळवारी शासकीय व निमशासकीय कर्मचाºयांनी तिरंगा चौकात धरणे आंदोलन केले.
ठळक मुद्देराज्य सरकारी कर्मचारी : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर