लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सत्तेत येण्यापूर्वी महायुतीने धनगरांना आरक्षण देण्याचा वचननामा जाहीर केला होता. मात्र चार वर्षे होऊनही राज्य सरकाने त्याची पूर्तता केली नाही. याचा निषेध म्हणून येथील बसस्थानक चौकात धनगर समाज संघर्ष समितीने सोमवारी महायुतीच्या वचननाम्याची होळी केली. शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.या आंदोलनाचे नेतृत्व संघर्ष समितीचे अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ. संदीप धवने यांनी केले. यावेळी धनगर महिला संघर्ष समितीच्या डॉ. प्रियंका धवने, संगीता गायनर, संगीता पुनसे, वर्षा पडवे, जिजाबाई उघडे, शारदा थोटे, सुनिता पारखे, माला पुनसे, कल्पना मोहोड, डॉ. संजय काळे, प्रकाश नवरंगे, पवन थोटे, अनिल पारखे, संतोष डफाळ, धनू लालपाली, दीपक पुनसे, नाना पचकाटे, प्रा. सदाशिव नरोटे, आशीष तुपटकर, कुंदन मार्कंड, नितीन कुनगर, अॅड़ निरंजन दाढे, बाबाराव मस्के, हरिश्चंद्र वाघमोडे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीच्या वचननाम्याची धनगर समाजातर्फे होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:01 PM