लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री तनुश्री दत्ता आरोप करीत आहे. सिनेसृष्टीत हे प्रकरण चर्चेत असताना विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी विधवांनी शनिवारी रस्त्यावर उतरून नाना पाटेकर यांचे समर्थन केले. ‘आमच्या नानाभाऊची बदनामी बंद करा’ असे नारे यावेळी देण्यात आले.नाना पाटेकर यांच्या समर्थनार्थ शेतकरी विधवांनी शनिवारी पांढरकवडा येथे निदर्शने केली. यावेळी अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या प्रतिमेची होळी करण्यात आली. यावेळी ‘केबीसी’ फेम शेतकरी विधवा अपर्णा मालीकर यांनी आपल्या भावना प्रगट केल्या. त्या म्हणाल्या, आम्ही हजारो शेतकरी विधवा अत्यंत अडचणीत असताना नाना पाटेकरांनी मदतीचा हात दिला. विदर्भ मराठवाड्यात आमच्या दारावर येऊन वडील तसेच मोठ्या भावासारखा आधार दिला. आज हजारो अनाथ शेतकरी विधवांचे पुनर्वसन करणाऱ्या आमच्या भावाची होत असलेली खोटी बदनामी आम्हाला व्यथित करीत आहे. आयटम डान्सर तनुश्री दत्ताने ही बदनामी बंद करावी व नाना पाटेकरांची माफी मागावी.’ अशा शब्दात त्यांनी आपली मागणी नोंदविली.या निदर्शन आंदोलनात शेतकरी विधवा भारती पवार, अंजूबाई भुसारी, गीता राठोड, वंदना गावंडे, अर्चना राऊत, कविता सिडाम, रंजना खडसे, कमल सुरपाम, उमा जिड्डेवार, शीला मांडवगडे, चंद्रकला मेश्राम, पौर्णिमा पोकुलवार, बबिता आगरकर, ज्योती जिड्डेवार, रमा ठमके, वंदना शेंडे, रंजना गुरनुले यांच्यासह शेकडो शेतकरी विधवा सहभागी झाल्या होत्या.नाना पाटेकर यांची बदनामी बंद करण्यात आली नाही तर विदर्भ-मराठवाड्यातील हजारो भगिनी मुंबईलानाना पाटेकरांच्या समर्थनार्थ पोहचतील व तनुश्री दत्ताला जाब विचारतील, असा इशारा शेतकरी विधवा संघटनेच्या भारती पवार यांनी दिला.
तनुश्री दत्ताच्या प्रतिमेची पांढरकवड्यात होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 11:34 PM
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री तनुश्री दत्ता आरोप करीत आहे. सिनेसृष्टीत हे प्रकरण चर्चेत असताना विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी विधवांनी शनिवारी रस्त्यावर उतरून नाना पाटेकर यांचे समर्थन केले.
ठळक मुद्देशेतकरी विधवांची निदर्शने : आमच्या नानाभाऊची बदनामी बंद करा