शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

दिग्रस येथे ‘कालनिर्णय’ची होळी; महापुरूषांच्या जयंतीचा उल्लेख टाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 5:49 PM

बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज आणि हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा उल्लेख टाळल्याने बंजारा समाज बांधवांनी गुरुवारी कालनिर्णय दिनदर्शिकेची होळी केली.

दिग्रस (यवतमाळ) : बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज आणि हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा उल्लेख टाळल्याने बंजारा समाज बांधवांनी गुरुवारी कालनिर्णय दिनदर्शिकेची होळी केली. यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे धर्मगुरू आहे. दिवंगत वसंतराव नाईक समाजाचे महानायक आहेत. त्यांनी राज्यात हरित क्रांती घडवून आणली. या दोन्ही महापुरुषांची जयंती शासनस्तरावर साजरी केली जाते. मात्र कालनिर्णय दिनदर्शिकेत या महापुरुषांच्या जयंती दिनाचा उल्लेख टाळण्यात आला. यामुळे बंजारा समाज बांधवांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. सर्वत्र संतप्त भावना प्रगट होत आहे. येथील शिवाजी चौकात बंजारा क्रांती दलातर्फे गुरुवारी कालनिर्णय दिनदर्शिका जाळून याचा निषेध नोंदविण्यात आला. संपूर्ण देशात १३ कोटी, तर महाराष्ट्रात एक कोटी बंजारा समाज बांधव वास्तव्याला आहे. संत सेवालाल महाराज यांची जयंती राज्यात सर्वत्र साजरी केली जाते. दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती राज्यात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. मागील वर्षीपासून १९ फेब्रुवारीला संत सेवालाल महाराज यांची जयंती शासनस्तरावर साजरी करण्याचा निर्णय झाला. मात्र कालनिर्णय दिनदर्शिकेत या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीचा उल्लेख टाळून बंजारा समाज बांधवांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार केल्याचा आरोप बंजारा समाज बांधवांनी केला. ही दिनदर्शिका जप्त करून नव्याने प्रकाशित करावी, अशी मागणी बंजारा क्रांती दलाने केली आहे. पंचायत समिती सभापती विनोद जाधव, सोसायटी अध्यक्ष बाबूसिंग जाधव, बंजारा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, तालुकाध्यक्ष लक्ष्मण चव्हाण यांच्या नेतृत्वात कालनिर्णय दिनदर्शिकेची होळी करण्यात आली. याप्रसंगी अमोल पवार, धीरज राठोड, कैलास चव्हाण, हंसराज राठोड, अशोक राठोड, ललित राठोड, सुनील जाधव, प्रदीप राठोड, अविनाश राठोड, इंदल पवार, अमोल पवार, किसन पवार, मनोहर राठोड, रमेश पवार आदी पदाधिकाºयांसह बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ