लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील दोन घरांना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत एक लाखापेक्षा जादा नुकसान झाले. मात्र नागरिकांनीच धावपळ करून ही आग आटोक्यात आणली. त्यामुळ मोठा अनर्थ टळला.ब्राम्हणगांव येथील श्रीराम खिरू ढोले व दिगांबर भुजगा पावडे यांच्या घराला अचानक आग लागली. आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले. दोन्ही घरांना आपल्या कवेत घेतले. आजूबाजूच्या घरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्यता होती. मात्र गावकºयांना घटनेची माहिती मिळताच सर्वांनी ढोले व पावडे यांच्या घराकडे धाव घेतली. नागरिकांनी मिळेल त्या साहित्याने पाणी ओतून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत श्रीराम ढोले यांचे ५४ हजार व दिगांबर पावडे यांचे २५ हजार रूपयांचे नुकसान झाले होते.या आगीत दोन्ही घरांतील बरेच साहित्य आगीच्या भक्ष्स्थानी सापडले. ढोले यांच्या घरातील लाकडी चौकटी, लाकडी साहित्य, दरवाजे आदी साहित्य जळाले. पावडे यांच्या घरातील मोटार व इतर साहित्य जळाले. महसूल विभागाने पंचनामा केला असून एक लाखांच्यावन नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला. आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला.
ब्राह्मणगाव येथे घरांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:35 PM
तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील दोन घरांना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत एक लाखापेक्षा जादा नुकसान झाले. मात्र नागरिकांनीच धावपळ करून ही आग आटोक्यात आणली.
ठळक मुद्देउमरखेड तालुका : गावकºयांनीच मिळविले नियंत्रण