शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:13 AM

महामानव, प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून आंबेडकरी आंदोलनासाठी निष्ठावान राहणाऱ्या जुन्या आणि तरुण आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा येथे घेण्यात आला.

ठळक मुद्दे१३५ जणांना सन्मानपत्र : चळवळीतील पहिली पिढी, योगदानाचे भरभरून केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महामानव, प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून आंबेडकरी आंदोलनासाठी निष्ठावान राहणाऱ्या जुन्या आणि तरुण आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा येथे घेण्यात आला. आंबेडकरी साहित्य व कला अकादमी तथा आंबेडकरी कार्यकर्ता सन्मान समितीच्यावतीने स्थानिक मेडिकल चौकातील बचत भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १३५ कार्यकर्त्यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र तथा ग्रंथ आणि मानधन देऊन यथोचित सन्मान करण्यात आला .आंबेडकरी चळवळीत बाबासाहेबांच्या सोबत व त्यांच्या महापरिनिवार्णानंतर झालेल्या आंदोलनात ज्यांनी स्वत:च्या कुटुंबाकडे लक्ष न देता समाजासाठी खस्ता खाल्ल्या अशा निष्ठावान कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान व्हावा आणि वर्तमानातील कार्यकर्तृत्वाचा वसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या उद्घाटक ज्येष्ठ रिपब्लिकन नेते दिवंगत रा.सु. गवई यांच्या पत्नी प्राचार्य कमलताई गवई होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष समता सैनिक दलाचे 'कॅप्टन' अशोक खंनाडे होते. डॉ. पुरणचंद्र मेश्राम, कवी ई.मो. नारनवरे, चंदन तेलंग, डॉ. दिलीप घावडे, बाळासाहेब सोनोने, पी.डी. डबले, बापुराव धुळे, संजय मानकर, मोहन भोयर ,महेंद्र मानकर, अविनाश भगत, प्रकाश भस्मे, विजय डांगे, सदाशिवराव भालेराव आदी मान्यवर हजर होते.रमाबाई आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा घेण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते यवतमाळतून गोविंद मेश्राम, जयप्रकाश चव्हाण, सुनील बोरकर, विनोद खोब्रागडे, अ‍ॅड. अमोल गणवीर, विजय पाटील, कमलाबाई गायकवाड, कल्पना मेश्राम, सरस्वती जोगळेकर, लोपामुद्रा महाजन, ईश्वर फुलूके, प्रकाश पाटील, कल्पना बागडे, अमर गायकवाड, मंदा गडपायले यांच्यासह एकूण ३२ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यातआला.बाभूळगाव तालुक्यातून पी.डी. डबले, उत्तमराव दिघाडे, शंकरराव वानखेडे, रत्नपाल डोफे, धर्मपाल माने यांच्यासह १० कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. दारव्हा तालुक्यातून विमल मुजमुले, सदाशिव परोपटे, देवबाजी खंडारे, अनुसयाबाई गडपायले, अशोक वाकोडे यांच्यासह नऊ लोकांचा सन्मान करण्यात आला. नेर तालुक्यातून रामकृष्ण अघम, महादेवराव घरडे, सुधाकर तायडे, जयकृष्ण बोरकर यांच्यासह इतर आठ लोकांचा सत्कार करण्यात आला.वणी तालुक्यातून रंजनाताई मोडक, गौतम तेलंग, पुंडलिक साठे, अशोक भगत, जयंत साठे, संजय तेलंग, पांढरकवडा तालुक्यातून बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी तुकाराम जनपदकर गुरुजी यांचा सन्मान त्यांच्या कन्या ताई कांबळे यांनी स्वीकारला. उमरखेड तालुक्यातून दादाराव पाईकराव, सोनबाजी हनवते, प्रेम हनवते, डॉ. अनिल काळपांडे, सज्जन बरडे, बापूरावजी धुळे यांच्यासह इतर १२ लोकांचा तर महागाव आर्णी तालुक्यातून पांडुरंग बरडे, पुरुषोत्तम चोखोबा खंडारे, शरद जाधव, संजय भगत, आर.एम. भालेराव, भीमराव वाघमारे (कळंब) आदी कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.प्रास्ताविक प्रा. विलास भवरे यांनी केले. आनंद गायकवाड यांनी भूमिका मांडली. संचालन सुनील वासनिक यांनी केले. ठरावाचे वाचन आयोजन समितीचे संजय बोरकर यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नवनीत महाजन, कवडूजी नगराळे, आनंद धवने, डॉ. सुभाष जमधाडे, सुमेध ठमके, डॉ. साहेबराव कदम, भीमसिंह चव्हाण, अ‍ॅड.धनंजय मानकर, अ‍ॅड. रवींद्र अलोणे, महेंद्र गजभिये, सोमेश्वर जाधव, सुरेश कांबळे, रत्नपाल डोफे, प्रा. डॉ. विश्वजित कांबळे, बंडू गंगावणे, बापुराव रंगारी, राहुल सोनवणे, आनंद डोंगरे, कल्पना चव्हाण, मालती गायकवाड आदींनी पुढाकार घेतला.