शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

पोळ्यानिमित्त करणार शेतकऱ्यांचा सन्मान

By admin | Published: August 29, 2016 12:57 AM

तालुक्यातील घोन्सा येथील ग्रामपंचायत कार्यालय व विविध संघटनेतर्फे येत्या १ व २ आॅगस्ट रोजी पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे

घोन्सा ग्रामपंचायतीचा उपक्रम : बैलजोडी, नंदीबैल सजावट स्पर्धावणी : तालुक्यातील घोन्सा येथील ग्रामपंचायत कार्यालय व विविध संघटनेतर्फे येत्या १ व २ आॅगस्ट रोजी पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच बैलजोडी व नंदीबैल सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे.गेल्या महिनाभरपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी पोळा सणावर दु:खाचे साटव पसरल्यामुळे ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनात विविध समितीने पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचे ठरविले आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालय, तंटामुक्त ग्राम समिती, ग्रामविकास सहकारी संस्था, मच्छि व्यवसाय संस्था, संत गजानन महाराज श्रद्धाश्रम, ग्राम शिक्षण समिती, दक्षता समिती, वनहक्क समिती, हनुमान देवस्थान समिती, बळीराजा चेतना समिती, वेकोलि कामगार संघ कुंभारखणीतर्फे १ व २ आॅगस्ट रोजी पोळ्यानिमित्त येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बैलजोडी व नंदीबैल सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच याच कार्यक्रमात गुढीधारक शेतकऱ्यांचा न्यू आदर्श व्यापारी गणेश मंडळातर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. बैैलजोडी सजावट स्पर्धेत उत्कृष्ट सजावट, एकरंगी जोडी व उत्कृष्ट पोस, अशा तीन गटात प्रत्येक पाच बक्षिसे देण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी तान्हा पोळ्यानिमित्त नंदीबैैल सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील १० विजेत्यांना बक्षिस देण्यात येईल. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी न्यू आदर्श गणेश मंडळ, शिवराया युवक मंडळ, व्यापारी गणेश मंडळ, शिवशक्ती गणेश मंडळ, पंचशील युवा मंडळ, बिरसा मुंडा युवक मंडळ, गुरूदेव सेवा मंडळ, महिला बाल युवक व गजानन पदावली भजन मंडळ परीश्रम घेत आहे. या स्पर्धेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)