शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

इंदिरा गांधी यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 10:53 PM

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांना त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देविविध उपक्रम : जीवन दर्शन चित्र प्रदर्शन, रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांना त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. येथील वडगाव रोडवरील ओम सोसायटीत झालेल्या या कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. इंदिराजीव पारमार्थिक ट्रस्ट आणि ओम क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.इंदिराजी जीवन दर्शन चित्र प्रदर्शन, रक्तदान शिबिर, सामान्य ज्ञान स्पर्धा, विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाºया महिलांचा गुणगौरव आदी कार्यक्रम पार पडले. शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे होते.प्रज्ञाताई चौधरी, रजनीताई शिर्के, साधना उमेश आडे, सुषमा प्रमोद गाढवे, सुनैना अजात, कांताबाई रमेश सुने, संगीता ठाकरे, सरोज देशमुख, शबाना परवीन, समीर शेख या महिलांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी ना. माणिकराव ठाकरे यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन झाले. इंदिरा गांधी यांनी अत्यंत खंबीरपणे नेतृत्व करीत देशाला प्रगतीपथावर नेणारे धोरणात्मक निर्णय घेतले. गोरगरीब लोकांचे जीवनमान या धोरणामुळे उंचावले, असे ते म्हणाले.वणी येथील प्रा.डॉ. अजय देशपांडे यांचे मार्गदर्शन झाले. सर्व समाजाच्या कल्याणाचा विचार उराशी बाळगणाºया इंदिराजींनी सातत्याने राष्टÑहिताला प्राधान्य दिले. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित होता, असे ते म्हणाले.माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया आदींनी समयोचित विचार मांडले. प्रास्ताविक इंदिराजीव आणि ओम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केले. संचालन कैलास राऊत, प्रा. घनश्याम दरणे, बापू देशमुख यांनी केले. आभार अरुण राऊत यांनी मानले.कार्यक्रमाला आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, माजी मंत्रीद्वय शिवाजीराव मोघे, प्रा.वसंत पुरके, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हा परिषद सभापती नंदिणी दरणे, माजी आमदार विजयाताई धोटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, किशोर दर्डा, बाळासाहेब चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, बसपाचे जिल्हाध्यक्ष तारीक लोखंडवाला, विद्याताई देशमुख, संध्याताई सव्वालाखे, नगरसेविका उषा दिवटे, प्रफुल्ल मानकर, अशोक घारफळकर, सुरेश चिंचोळकर, वसंत घुईखेडकर, पुष्पा नागपुरे, वनिता देशमुख, अशोक बोबडे, प्रा. शंकरराव सांगळे, माणिकराव भोयर, जीवन पाटील, सुभाष पाटील कदम, अनिल गायकवाड, अर्चना धर्मे, मीनाक्षी वेट्टी, अविनाश देशमुख, दिनेश गोगरकर, प्रा. शिर्के, प्रा. राठोड, पंकज देशमुख, बाबू पाटील वानखडे, बाळू काळे, बालू पाटील दरणे, आनंदराव जगताप, एकनाथराव डगवार, राजू निलावार, सतीश बनगीनवार, सुनील काळे, बाळासाहेब सरोदे, आनंद बेंद्रे, निखिल गायकवाड, विवेक दौलतकर, अरविंद वाढोणकर, अमोल गिते, मंगेश गोगरकर, काटोले आदी उपस्थित होते.सामान्य ज्ञान स्पर्धाइंदिरा गांधी यांच्या जीवन कार्यावर तीन गटात सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. यात सहाशेवर विद्यार्थी सहभागी झाले होते. गटनिहाय तीन, दोन व एक हजार रुपयांचे बक्षीस पहिल्या तीन क्रमांकाना देण्यात आले. प्रत्येक गटात प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.