लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हास्तरीय आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे बचत भवनात घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आदी उपस्थित होते.जिल्हास्तरीय आशा पहिला पुरस्कार म्हसोला (आर्णी) येथील नंदा जयसिंग राठोड, तर द्वितीय बेलोरा (ता.यवतमाळ) येथील लता सहारे यांना प्रदान करण्यात आला. नावीन्यपूर्ण प्रथम पुरस्काराच्या मानकरी वेगाव (ता.मारेगाव) येथील कल्पना जेंगटे ठरल्या. अकोलाबाजार येथील वंदना कवडू गेडाम यांना द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला.गटप्रवर्तकात प्रथम क्रमांक तबस्सूम फरीद, द्वितीय वंदना वाळूकर, तर तृतीय क्रमांक आशा बडेराव यांना देण्यात आला.आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्राचा राज्यात दुसरा क्रमांक आला. याबद्दल डॉ. पी.एस. चव्हाण, तर क्षयरोग प्रतिबंधात्मक कार्यक्रमात राज्यात तिसरा क्रमांक आल्याबद्दल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांना सन्मानित करण्यात आले. संचालन पुर्णिमा गजभिये यांनी, तर आभार वैशाली कागदे यांनी मानले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) विशाल जाधव, डॉ. किशोर कोषटवार, डॉ. मनोज तगडपेल्लीवार, डॉ. प्रीती दुधे, नितीन ठाकूर आदी उपस्थित होते.
आशा स्वयंसेविका सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:41 PM
जिल्हास्तरीय आशा स्वयंसेविका पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे बचत भवनात घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आदी उपस्थित होते.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेतर्फे गौरव : म्हसोला व वेगावला प्रथम पुरस्कार